शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावरील ते बेवारस दृष्टीहीन बाळ जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होणार

By आनंद डेकाटे | Updated: August 11, 2025 20:26 IST

बेवारस, दृष्टिहीन माला पापळकर हिची प्रेरणादायी कहानी : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रक्रियेला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीच एक बाळ रडत होतं. कुणाचं तरी ‘नकोसं’ झालेलं एक छोटंसं जीवंत अस्तित्व. डोळ्यात प्रकाश नव्हता, शरीर अत्यंत अशक्त… पण त्या क्षणी सुरू झाली एक विलक्षण आणि प्रेरणादायी कथा. माला शंकरबाबा पापळकर यांची. त्या अंधारात जन्मलेली माला आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक पदावर रुजू होणार आहे. एका बेवारस, दृष्टिहीन मुलीचं हे यश केवळ तिच्या जिद्दीमुळे, परिश्रमामुळे आणि माणुसकीवर विश्वास असलेल्या काही थोडक्या लोकांमुळे पूर्ण होऊ शकलं.

मालाला अमरावतीच्या वझ्झर येथील दिव्यांग बेवारस बालगृहात आणण्यात आलं. जिथे तिच्या जीवनात प्रकाश झाला तो म्हणजे पद्मश्री कर्मयोगी शंकरबाबा पापळकर यांच्यामुळे. त्यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली. तिचं नाव ‘माला’ ठेवलं आणि तिला केवळ आश्रयच नाही, तर ‘ओळख’ दिली. शिक्षणाची ओढ, वाचनाची आवड, आणि शंकरबाबांचा आधार यामुळे माला शिकत गेली. ब्रेल लिपीतून दहावी, बारावी, पदवी… आणि पदव्युत्तर शिक्षणही.

जगण्यातली प्रत्येक पायरी मालेसाठी परीक्षा होती. ना जन्मदाते होते, ना डोळ्यांचा प्रकाश. पण अंगात होती ती अपराजेय इच्छाशक्ती. अपंगत्वाच्या मर्यादा झुगारून तिने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१९ पासून तिने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरूवात केली. तर २०२३ मध्ये तिने एमपीएससी 'ग्रुप सी' मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. तेव्हापासून ती नियुक्तीच्या प्रतीक्षेत होती. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून तिची नियुक्ती होणार आहे. तिच्यासोबतच एकूण ५४ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रीया सोमवारपासून सुरू झाली. सोमवारी डाक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आले. स्वत: शंकरबाबा पापाळकर सुद्धा तिच्यासोबत होते. येत्या काही दिवसात मालाला नियुक्तीपत्र दिले जाईल.

सुवर्णाक्षरात लिहिली जाणारी ऐतिहासिक घटना : पद्मश्री शंकरबाबा पापळकरयावेळी पद्मश्री शंकरबाबा पापळकर म्हणाले, जन्मजात अंध आणि बेवारस असलेली मुलगी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची भारतातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे ती सुवर्णाक्षरात लिहिली जाणारी ऐतिहासिक घटना आहे. आज आवश्यक प्रमाणपत्रांच्या व्हेरिफिकेशन झाली बोलावण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी प्रक्रिया पार पाडताना आमची आस्थेने काळजी घेतली. स्वत: जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी आमच्याशी संवाद साधला. मालाचे कौतुक केले. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मालाला नियुक्तीपत्र दिले जाईल, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यंनी बोलून दाखवल्याचे पापळकर यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर