शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रेमीयुगुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; विषारी औषध प्राशन केले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 21:42 IST

Nagpur News घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलाने शेतात जाऊन विषप्राशन केले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्या दोघांचाही मृत्यू झाला.

ठळक मुद्दे माेवाड परिसरात आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर : प्रेमीयुगुलाने घरून पळून येत शुक्रवारी (दि. २०) रात्री माेवाड (ता. नरखेड) परिसरातील गाेधनी फाटा येथील दिलीप बाेडखे यांचे शेत गाठले आणि तिथे दाेघांनीही विषारी औषध प्राशन केले. माेवाड येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर शहरातील नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये भरती केले हाेते. त्या दाेघांचाही शनिवारी (दि. २१) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सूरज वगारे (१८, रा. महेंद्री, ता. नरखेड) व रसिका सुनील गायकवाड (१६) अशी मृतांची नावे आहेत. रसिका ही शिक्षणानिमित्त तिच्या मामाकडे नायगाव (ठाकरे) (ता. नरखेड) येथे राहायची. काही दिवसांपूर्वी त्यांची आपसात ओळख झाली आणि पुढे याच ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्या प्रेमप्रकरणाची गावातील नागरिकांनाही माहिती हाेती.दाेघेही शुक्रवारी दुपारी घरून पळून येत जलालखेडा (ता. नरखेड) येथे आले हाेते. तिथून ते ऑटाेने माेवाडला आले. माेवाड शहरापासून दीड किमीवर असलेल्या दिलीप बाेडखे यांच्या गाेधनी फाट्याजवळील शेतात गेले आणि तिथे दाेघांनीही विषारी औषध प्राशन केले. दरम्यान, ते दाेघेही उमरी येथील काही तरुणांना बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यामुळे त्यांनी दाेघांनाही माेवाड येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. प्रथमाेपचार केल्यानंतर दाेघांनाही नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान दाेघांचाही मृत्यू झाला.

कमी वय, लग्नाचा विचार आणि नैराश्य

प्रेमप्रकरणाची माहिती इतरांना झाल्याने दाेघांच्याही मनात बदनामीचे विचार घाेळत हाेते. यातून सुटका करण्यासाठी त्यांनी लग्न करण्याचा विचार केला हाेता. परंतु, दाेघेही अल्पवयीन असल्याने लगेच लग्न करणेही त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे दाेघांनाही नैराश्य आले हाेते. याच नैराश्येतून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत त्यावर अंमल केला. 

बेपत्ता असल्याची तक्रार

रसिका सायंकाळी घरी न आल्याने तिच्या मामाचे परिसरात शाेध घेतला. ती कुठेही आढळून न आल्याने मामाने जलालखेडा पाेलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार नाेंदविली. त्यामुळे जलालखेडा पोलिसांनी भादंवि ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. काही वेळाने तिने तिच्या प्रियकरासाेबत विषारी औषध प्राशन केल्याची माहिती जलालखेडा पाेलिसांना मिळाली हाेती

टॅग्स :Deathमृत्यूLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट