शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

थरार दहीहांडीचा : एकावर एक सात थर अन् गोविंदा झुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 22:54 IST

दहीहांडी शिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमी अधुरीच ठरते. अशा या सोहळ्याचा थरार शनिवारी इतवारी येथील सराफा ओळी, माधवराव मुकाजी खुळे चौकात अनेकांना अनुभवता आला.

ठळक मुद्देपुरुषांच्या गटात जय भोलेश्वर क्रीडा मंडळाने फोडली दहीहांडीमहिलांच्या गटात राधाकृष्ण महिला मंडळाने मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा अन् दहीहांडीची स्पर्धा यांचे अतूट असे नाते आहे. किंबहुना, दहीहांडी शिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमी अधुरीच ठरते. अशा या सोहळ्याचा थरार शनिवारी इतवारी येथील सराफा ओळी, माधवराव मुकाजी खुळे चौकात अनेकांना अनुभवता आला.

या दहीहांडी उत्सवात महिलांच्या गटात तीन पथक आणि पुरुषांच्या गटात नऊ पथकांनी सहभाग घेतला. पुरुषांची दहीहांडी फेरी संध्याकाळी ७ वाजतापासून रंगली आणि बघण्यास आलेल्या नागरिकांचा जल्लोष सातत्याने वाढत गेला. सर्व पथकांनी एक एक करून आपले मनोरे उभे केले. मात्र, कुणाच्याच हातात यश पडले नाही. अखेर, दहीहांडीची उंची कमी करण्यात आली. तरी देखील दहीहांडी फोडली जाईल की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, सक्करदरा, न्यू सोनझारीनगरच्या जय भोलेश्वर दहीहांडी क्रीडा मंडळाच्या ३५ ते ४० गोविंदाच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध शैलीमध्ये मनोरे रोवले. या मनोऱ्यांचा पाया अगदी भक्कम करून, त्यावर एक-एक असे सात थर रचले आणि दहीहांडी फोडणास तत्पर असलेल्या अमित बबलू भैरे या गोविंदाने दहीहांडी हातात घेतली. मात्र, तोल गडबडण्याची चिन्हे दिसताच, त्याने दहीहांडीच्या दोराला पकड मजबूत केली आणि त्याला लटकून तेथेच तो कवायती करायला लागला. इकडे मात्र अनेकांच्या मनात धडकी भरली होती. दहीहांडीच्या दोन्ही टोकाला असलेल्या नियोजकांनी दोरी हळूहळू खाली उतरवत एकटाच लटकलेल्या कन्हैयाला सकुशल उतरवले आणि एकच जल्लोष झाला. ‘जय कन्हैया लाल की, हाथी घोडा पालखी’च्या गजरात आयोजकांसह विजेत्या पथकाने जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. विजेच्या पथकाला भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, जयप्रकाश गुप्ता यांच्या हस्ते विजेतेपदाचा ‘स्व. प्रल्हादराव शिवनारायण अग्रवाल स्मृती गोविंदा’चषक प्रदान करण्यासोबतच २ लाख ५१ हजार रुपयाची विजयी राशी प्रदान करण्यात आली.तत्पूर्वी महिलांच्या दुपारी ४ वाजताच्या सुमारास पार पडलेल्या दहीहांडी उत्सवात सोनेगाव येथील राधाकृष्ण महिला मंडळाच्या पथकातील गोपिकांनी बाजी मारली. विजेत्या पथकाला ‘स्व. भागीरथाबाई गोपाळराव मते स्मृती गोपिका’ चषक प्रदान करण्यासोबतच ५१ हजार रुपये विजयी राशी सविता मोहन मते व शैलजा खुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी, डीसीपी गुन्हे नीलेश भरणे, माजी मंत्री अनिस अहमद, उत्सवाचे संयोजक संजय खुळे उपस्थित होते. या संपूर्ण सोहळ्याला माजी आ. मोहन मते, आ. विकास कुंभारे, माजी खा. अविनाश पांडे, आ. गिरीश व्यास, नगरसेवक दयाशंकर तिवारी, रमेश पुणेकर, संजय महाजन, एसीपी राजदत्त बनसोड, एसीपी शशिकांत महावतकर, ज्ञानेश्वर काटोले, राजू हरडे, महेंद्र पळसापुरे, कुणाल गडेकर, नीरज जैन, रिंकू जैन, ऋषीकेश खुळे, अभिषेक लुनावत, रितेश सोनी, पवन हटवार, राजू जैन उपस्थित होते.मी कन्हैया हाव न जी! - अमित भैरेदहीहांडी फोडणाऱ्या पथकाचा हांडी फोडणारा गोविंदा अमित बबलू भैरे याला.. एकटाच लटकून राहिल्याची भीती वाटली नाही का, असा प्रश्न विचारला असता.. मी कन्हैया हाव न जी, मंग कायची भीती! असे उत्तर देत संपूर्ण गोविंदांना स्फुरण चढवले.सात थर रचून प्रथमच दहीहांडी फोडण्याचा दावाविजेत्या पथकाचे सिनियर गोविंदा संग्राम भिमारे यांनी, सात थर रचून, त्यावर गोविंदा नाचण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा केला. आतापर्यंत पाच-सहा थरापर्यंत मनोरे रचून दहीहांडी फोडण्याचा पराक्रम अनेक गोविंदा पथकाने केले असून, आम्ही नवा विक्रम स्थापित केल्याचा दावा भिमारे यांनी केला.

टॅग्स :Dahi Handiदहीहंडीnagpurनागपूर