शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जागतिक मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी ठाणेदार यांची निवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 21:56 IST

जागतिक मराठी अकादमीच्यावतीने १६ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ४, ५ व ६ जानेवारी रोजी नागपूर येथे होऊ घातले आहे. या तीन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी अमेरिकेचे रहिवासी असलेले उद्योजक डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे४, ५ व ६ जानेवारीला आयोजन : जगभरातील साहित्यप्रेमींची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक मराठी अकादमीच्यावतीने १६ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ४, ५ व ६ जानेवारी रोजी नागपूर येथे होऊ घातले आहे. या तीन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी अमेरिकेचे रहिवासी असलेले उद्योजक डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांची निवड करण्यात आली आहे.अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, उपाध्यक्ष यशवंतराव गडाख पाटील व गिरीश गांधी, कोषाध्यक्ष उदय लाड व आयोजन समितीचे शहर समन्वयक शशीकांत चौधरी यांनी डॉ. ठाणेदार यांच्या निवडीबाबत माहिती दिली. युएसएच्या अ‍ॅक्रॉन विद्यापीठातून पॉलिमर केमिस्ट्री विषयात पीएचडी प्राप्त डॉ. ठाणेदार यांनी रसायन व औषधी निर्मितीचा उद्योग स्थापन केला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल अमेरिकेतील तरुण उद्योजक म्हणून तीनदा सन्मानितही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या मिशिगन राज्याच्या राज्यपाल पदाची निवडणूकही त्यांनी लढविली असून तब्बल दोन लाख मते प्राप्त केली होती. अमेरिकेत राहणाºया एखाद्या भारतीयाचे हे यश अभिमानास्पद आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘ही श्रींची इच्छा’ या आत्मकथेनेही विक्रीचे उच्चांक गाठले आहेत. उत्साही आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. ठाणेदार यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.जागतिक मराठी साहित्य परिषद - ‘शोध मराठी मनाचा’ हे तीन दिवसीय संमेलन वैदर्भीयांसाठी साहित्यिक मेजवानी ठरणार आहे. विशेष म्हणजे अकादमीचे पहिले जागतिक संमेलन नागपुरातच झाले होते व राम शेवाळकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. देशाच्या मध्यभागी असलेले नागपूर शहर वेगाने विकसित होत असून सांस्कृतिक क्षेत्रातही शहर झपाट्याने पुढे येत आहे. अकादमीतर्फे आतापर्यंत झालेली सर्व जागतिक मराठी संमेलने भारतातच भरवली गेली आहेत. मात्र त्यात सहभागी होणारे साहित्यिक, कलावंत, व्यावसायिक, उद्योजक प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी हे परदेशातूनही येतात. त्यामुळेच याला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनnagpurनागपूर