शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

महागाई विरोधात थाळीनाद

By admin | Updated: October 28, 2015 03:24 IST

केंद्रात व राज्यात सत्तेत येण्यापूर्वी अच्छे दिन येणार, असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक : डाळींचे भाव कमी करानागपूर : केंद्रात व राज्यात सत्तेत येण्यापूर्वी अच्छे दिन येणार, असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते. परंतु जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहे. तूर डाळ प्रति किलो २०० रुपयावर गेली आहे. महागाईमुळे गरीब माणूस उद्ध्वस्त झाला आहे.नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. राज्यातील युती सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मंगळवारी केला.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी आकाशवाणी चौकात ‘थाळीनाद’आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री व शहर अध्यक्ष अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दिवाळीचा सण जवळ आला असताना डाळी व खाद्यतेलाचे भाव आकाशाला भिडले आहे. केंद्रात व राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत असताना तूर डाळीचे भाव ९० रुपयावर गेले होते. परंतु भाववाढ कमी करण्यासाठी एक लाख मेट्रिक टन तूरडाळ आयात क रून सवलतीच्या दरात ५५ रुपये किलो भावाने राज्यातील रेशन दुकानातून उपलब्ध केली होती. असा ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच शेतकरी अडचणीत असल्याने सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी महिलांनी थाळीनाद करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत असून महागाई आकाशाला भिडल्याने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. आघाडी सरकारच्या काळात लोकांना ५५ रुपये किलो दराने डाळ उपलब्ध केली होती. परंतु भाववाढीला आळा घालण्यासाठी युती सरकार कोणतेही निर्णय घेत नसल्याचा आरोप देशमुख यांनी केला.आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार दीनानाथ पडोळे, शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुटे, ग्रामीणचे कार्याध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे, प्रदेश उपाध्यक्ष सलील देशमुख, माजी अध्यक्ष अजय पाटील, वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर, बंडू उमरकर, राजु नागुलवार, प्रगती पाटील, दुनेश्वर पेठे,राजेश कुंभलकर, रमन ठवकर, मुन्ना तिवारी, तनुज चौबे, नूतन रेवतकर, शब्बीर विद्रोही, विशाल खांडेकर, बजरंगसिंग परिहार, माधुरी कुसुंबे, कामिल अंसारी,अशोक राऊ त, अशोक काटले, ज्ञानबा मसके, मिलिंद मानापुरे, राजू जैन, ईश्वर बाळबुधे, सुरेश धनवानी, तारामती रहागुडे, कल्पना मानकरआदी उपस्थित होते.चित्रा वाघ व अनिल देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन दिले.(प्रतिनिधी)