शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळातील डॉक्टरांचे थाळी बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 01:21 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कणा असलेल्या निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नाही. या विरोधात सोमवारपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. बुधवारी ‘थाळी बजाओ’ आंदोलन करून मेडिकलचा परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्देअधिष्ठाता कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कणा असलेल्या निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नाही. या विरोधात सोमवारपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. बुधवारी ‘थाळी बजाओ’ आंदोलन करून मेडिकलचा परिसर दणाणून सोडला.रुग्णालयात २४ तास सेवा देऊनही वेळेवर विद्यावेतन मिळत नसल्याने राज्यात बहुसंख्य मेडिकल कॉलेजमध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. नागपूर मेडिकलच्या निवासी डॉक्टरांना नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्याचे अद्यापही विद्यावेतन मिळाले नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी निवासी डॉक्टरांनी काळी रिबीन बांधून रुग्ण सेवा दिली. बुधवारी ‘थाळी बजाओ’ आंदोलनातून लक्ष वेधले. विशेष म्हणजे, तीन महिन्यांपूर्वी असाच प्रश्न समोर आला होता. तेव्हा मेडिकल प्रशासनाने स्थानिकस्तरावर स्वत:च्या खात्यातून निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन अदा केले. मात्र यावर कोषागार विभागाने आक्षेप नोंदविला. यातच दोन महिन्याचे विद्यावेतन देण्या एवढा निधी सध्या खात्यात नसल्याचे सांगण्यात येते. मेडिकलमधील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनापोटी अद्याप १८ कोटी रुपयांची थकबाकी सरकारकडे शिल्लक आहे. ती रक्कम वळती झाल्यानंतरच हा तिढा सुटणार असल्याचे बोलले जात आहे.विद्यावेतनावर महिन्याकाठी दोन कोटी ४० लाखांचा खर्चमेडिकलमध्ये सुमारे ६०० निवासी डॉक्टर आहेत. तर वरिष्ठ निवासी डॉक्टरांची संख्या १५० इतकी आहे. त्यांच्या विद्यावेतनावर महिन्याकाठी दोन कोटी ४० लाख रुपये इतका खर्च होतो. नोव्हेंबरपासून डॉक्टरांना विद्यावेतनच मिळाले नाही. बुधवारी मोर्चा काढून मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. अधिष्ठाता कार्यालयासमोर शेकडो डॉक्टरांनी एकत्र येत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. शासनाकडून डॉक्टरांचा छळ सुरू असून, विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.तीन दिवसांची मुदतआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मार्डचे पदाधिकारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पुढील तीन दिवसांत विद्यावेतनाचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मिळाले आहे. यामुळे आता तीन दिवसानंतर आंदोलनाची भूमिका स्पष्ट होईल.डॉ. आशुतोष जाधवअध्यक्ष, मार्ड मेडिकल

 

टॅग्स :doctorडॉक्टरagitationआंदोलन