शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

नागपुरात थायलंडच्या तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 20:13 IST

चेंजिंग रूममध्ये शिरून एका थायलंडच्या तरुणीवर मॉलमधील एका कर्मचाऱ्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी ५ ते ५.३० च्या दरम्यान ही संतापजनक घटना घडली.

ठळक मुद्देमॉलच्या चेंजिंग रूममधील घटना : आरोपीला पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चेंजिंग रूममध्ये शिरून एका थायलंडच्या तरुणीवर मॉलमधील एका कर्मचाऱ्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी ५ ते ५.३० च्या दरम्यान ही संतापजनक घटना घडली. जयसिंग प्रीतमसिंग परिहार (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, संतप्त जमावाने आरोपीला चोप दिला. तर, पोलिसांनी नंतर त्याला अटक केली.येथील रोहण नामक तरुण उन्हाळयाच्या सुटीत थायलंडला फिरायला गेला होता. तेथे त्याची पीडित तरुणीसोबत (वय २२) मैत्री झाली. तेव्हापासून ते मोबाईल, फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. नागपुरातील गणेशोत्सव बघण्यासाठी आपण भारतात येत असल्याचे तिने रोहणला कळवले. त्यानुसार ती १० सप्टेंबरला मुंबईत आणि ११ ला सायंकाळी नागपुरात आली. वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये ती मुक्कामी थांबली आहे. रविवारी ती आवश्यक कपडे खरेदी करण्यासाठी रोहणसोबत सीताबर्डीतील इटर्निटी मॉलमध्ये गेली. कपडे व्यवस्थित आहे की नाही ते बघण्यासाठी ती चेंजिंग रूममध्ये गेली. ती कपडे बदलवित असताना तिच्यावर नजर ठेवून असलेला आरोपी परिहार चेंजिंग रूममध्ये शिरला अन् त्याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. तरुणीने आरडाओरड केल्याने रोहन तसेच मॉलमधील अन्य मंडळी धावली. त्यांनी परिहारला पकडून चोप दिला. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांना माहिती देऊन बोलविण्यात आले.पोलिसांकडून गंभीर दखलआरोपी परिहार हा महादुला कोराडी येथील श्रीवासनगरात राहतो. तो मॉलमध्ये सेल्समन म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. सीताबर्डीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी पीडित तरुणी आणि तिच्या मित्राला धीर दिला. त्यांना आश्वस्त करीत आरोपीविरुद्ध कलम ३५४ (अ) गुन्हा नोंदवून परिहारला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग