शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

१३ कोटींच्या कर्जाचे आमिष : कापड व्यापाऱ्याचे २६ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:23 IST

कपडा व्यापाऱ्याला १३ कोटी रुपयांचे विनातारण कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी त्यांचे २६ लाख रुपये हडपले. तहसील पोलीस ठाण्यात या प्रकरणी बुधवारी अकाऊंटन्टसह दोघांवर गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देअकाऊंटन्टसह दोघांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कपडा व्यापाऱ्याला १३ कोटी रुपयांचे विनातारण कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी त्यांचे २६ लाख रुपये हडपले. तहसील पोलीस ठाण्यात या प्रकरणी बुधवारी अकाऊंटन्टसह दोघांवर गुन्हा दाखल झाला. आशिष सतीश जैन (वय ४३) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.जैन तहसीलच्या मस्कासाथमध्ये राहतात. त्यांचे गांधीबागमधील हॅण्डलूम मार्केटमध्ये कपड्याचे दुकान आहे. आरोपी ताहिर शमीमुल्ला खान (रा. हॅण्डलूम मार्केट, गांधीबाग) हा जैन यांच्याकडे खातेपुस्तिका (अकाऊंट) लिहिण्याचे काम करायचा. त्यामुळे जैनसोबत आरोपी खानची ओळख होती. तीन वर्षांपूर्वी व्यावसायिक अडचणीमुळे जैन कर्ज घेण्यासाठी इकडे तिकडे संपर्क करीत होते. खान याला त्यांची अडचण लक्षात येताच त्याने आपले मुंबईत काही आर्थिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संबंध असून, ते विनातारण मोठ्या रकमेचे कर्ज कमीत कमी व्याजदराने उपलब्ध करून देतात, अशी थाप मारली. जैन यांनी त्याला मुंबईतील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून देण्यास सांगितले असता आरोपी खान याने त्यांना मुंबईत नेले. तेथे म्हाडा मेरेथॉन टॉवर, लोअर परेलमध्ये राहणारा राधाकृष्ण ठोंबरे याची ओळख करून दिली. ठोंबरेने आपण मोठा आर्थिक कारभार सांभाळणाऱ्या संस्थेत प्रतिनिधी म्हणून काम करतो. आमची संस्था मोठ्या रकमेचे कर्ज कोणतेही तारण न ठेवता उपलब्ध करून देते, असे जैन यांना सांगितले. जैन यांनी आपल्याला एक कोटी रुपयांचे कर्ज हवे असल्याचे सांगितले. आपल्या व्यवसायाचा ताळेबंदही आरोपींकडे दिला. तो बघितल्यानंतर आरोपी खान आणि ठोंबरेने जैन यांना तुम्हाला १३ कोटींचे कर्ज मिळू शकते, अशी थाप मारली. ते मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कारणाखाली जैन यांच्याकडून १ नोव्हेंबर २०१६ ते जुलै २०१९ या कालावधीत तब्बल २६ लाख रुपये उकळले. आरोपींनी जैन यांना कधी बँक खात्यात तर कधी रोख स्वरूपात रक्कम मागितली. तब्बल अडीच ते तीन वर्षे होऊनही आरोपी कर्जाची रक्कम देत नसल्यामुळे जैन यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता आरोपी खान आणि ठोंबरेचा कुठल्याही आर्थिक संस्थेसोबत संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी