शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:07 IST

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासद्वारे बेघर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या गृह प्रकल्पांमध्ये खोटी माहिती देऊन सदनिका मिळवण्याच्या प्रकरणात चिमूरचे आमदार ...

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासद्वारे बेघर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या गृह प्रकल्पांमध्ये खोटी माहिती देऊन सदनिका मिळवण्याच्या प्रकरणात चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १९९, २०० व ४२० अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची ग्वाही इमामवाडाचे पोलीस निरीक्षक एम. एम. साळुंखे व सक्करदराचे पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी शुक्रवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एम. देशमुख यांना दिली.

सदर प्रकरणात या न्यायालयाने गेल्या २४ डिसेंबर रोजी ॲड. तरुण परमार यांचे दोन अर्ज मंजूर करून इमामवाडा व सक्करदरा पोलीस निरीक्षकांना भांगडिया यांच्याविरुद्ध संबंधित गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. २८ डिसेंबर रोजी दोन्ही पोलीस निरीक्षकांना त्या आदेशाची माहिती देण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी एफआयआर नोंदवले नाही. परिणामी, ॲड. परमार यांनी दोन्ही पोलीस निरीक्षकांवर अवमानना कारवाई करण्यासाठी नवीन अर्ज दाखल केले. त्यात न्यायालयाने दोन दिवसापूर्वी दोन्ही पोलीस निरीक्षकांना नोटीस बजावून भांगडिया यांच्याविरुद्ध एफआयआर का नोंदवला नाही अशी विचारणा केली होती व यावर शुक्रवारी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दोन्ही पोलीस निरीक्षकांनी विविध कारणे सांगून स्वत:ची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते न्यायालयाचे समाधान करू शकले नाही. शेवटी न्यायालयाने कडक भूमिका घेतल्यानंतर त्यांनी भांगडिया यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची ग्वाही दिली. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणावर येत्या मंगळवारी पुढील सुनावणी निश्चित केली. त्या सुनावणीत पोलिसांनी ग्वाहीचे पालन केले किंवा नाही, याची माहिती घेतली जाईल. अर्जदारातर्फे ॲड. सतीश उके व ॲड. वैभव जगताप यांनी कामकाज पाहिले.

असे आहे प्रकरण

कीर्तीकुमार भांगडिया यांच्या पत्नी सोनल यांनी उंटखानामधील दहीपुरा येथील नासुप्र लोकगृह निर्माण योजनेतील टू-बीएचके सदनिका (इमारत - एबी, गाळा क्र. ३०१) मिळवली आहे. त्यांच्याकडे २४ सप्टेंबर २००७ पासून त्या सदनिकेचा ताबा आहे. त्यानंतर कीर्तीकुमार भांगडिया यांनी या योजनेतील दुसरी टू-बीएचके सदनिका (इमारत - एबी, गाळा क्र. ३०३) आणि सक्करदरामधील आयुर्वेदिक ले-आऊट येथील नासुप्र गृह योजनेतील थ्री-बीएचके सदनिका (इमारत - डी, गाळा क्र. २०२) मिळवली. त्यांच्याकडे दहीपुरा येथील सदनिकेचा २५ जून २००८ पासून तर, आयुर्वेदिक ले-आऊट येथील सदनिकेचा ९ एप्रिल २००९ पासून ताबा आहे. या दोन्ही सदनिका मिळविताना त्यांनी स्वत:सह पत्नी व मुलांच्या नावाने नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास हद्दीमध्ये घर, गाळे किंवा भूखंड नसल्याची खोटी माहिती लिहून दिली असे परमार यांचे म्हणणे आहे.