शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:20 IST

देशातील दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही. त्यासाठी काश्मीरमधील नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे, असे मत आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मंगळवारी शिवजयंती महोत्सवात बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देसुधीर सावंत यांचे मत : काश्मिरी नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही. त्यासाठी काश्मीरमधील नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे, असे मत आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मंगळवारी शिवजयंती महोत्सवात बोलताना व्यक्त केले.हा महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज जयंती आयोजन समितीच्यावतीने शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे, जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, शिवाजी उद्योजक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार शिंदे, कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया, अखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय महासभेचे राष्ट्रीय महासचिव आर. एस. कनौजिया, विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. नीरज खांदेवाले, जनमंच संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पांडे, आम आदमी पार्टीचे पूर्व विदर्भ संघटक देवेंद्र वानखेडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सध्या काश्मीरमधील नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे दहशतवादी अधिक सक्रिय झाले आहेत. येणाऱ्या काळात देशाच्या सुरक्षाविषयक धोरणामध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. देशाचे संरक्षण मंत्रालय सेनेशी संबंधित व्यक्तीना चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. परंतु, सत्तेच्या लालसेपोटी कुणालाही संरक्षण मंत्री केले जाते, असे सावंत यांनी पुढे बोलताना सांगितले. याशिवाय त्यांनी ‘डब्ल्यूटीओ’चा कडाडून विरोध केला व शेतकऱ्यांना झिरो बजेट शेती करण्याचे आवाहन केले.अ‍ॅड. अणे यांनी ‘जागतिक आर्थिक धोरण व राजकारणामुळे राज्यघटनेला धोका’ या विषयावर मार्गदर्शन केले. सरकारने केवळ व्यापारी दृष्टिकोन ठेवल्यास देशात अराजकता माजेल. सरकारचे धोरण नेहमी जनतेच्या भल्याचे असले पाहिजे. ‘डब्ल्यूटीओ’च्या धोरणाचा भारतीय नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देशाची कल्याणकारी राज्य ही संकल्पना धोक्यात आली आहे. सरकारने यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे, असे त्यांनी सांगितले.पवार यांनी ‘कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम’ या विषयावर प्रकाश टाकला. शेती व शेतकऱ्यांचे कल्याण केल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. विजयकुमार शिंदे यांनी प्रास्ताविक, अरुण वनकर यांनी संचालन तर, रविशंकर मांडवकर यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजnagpurनागपूर