शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

अतिक्रमण हटविण्यावरून नागपुरातील हसनबागमध्ये तणाव , पोलिसांचा लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 8:44 PM

महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे बुधवारी हसनबाग पोलीस चौकी ते हसनबाग चौक दरम्यानच्या मार्गावरील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. सकाळच्या सुमारास कारवाईला सुरुवात करताच नागरिकांनी दुकानदारांनी प्रचंड विरोध दर्शविला. यावरून वाद निर्माण झाला. लोकांचा जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात अमिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्दे७५ अतिक्रमणाचा सफाया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे बुधवारी हसनबाग पोलीस चौकी ते हसनबाग चौक दरम्यानच्या मार्गावरील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. सकाळच्या सुमारास कारवाईला सुरुवात करताच नागरिकांनी दुकानदारांनी प्रचंड विरोध दर्शविला. यावरून वाद निर्माण झाला. लोकांचा जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात अमिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. 

हसनबाग पोलीस चौकी ते हसनबाग चौक, हसनबाग कब्रस्तान चौक या दरम्यानच्या मार्गावरील फूटपाथवर चिकन बिर्याणी सेंटर, चिकन व मटन विक्रेते, पानठेले, वेल्डींग, हॉटेल्स व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. दुकानासाठी उभारलेले शेड, ओटे, पथकाने जेसीबीच्या साहाय्याने हटविले. यात ७५ अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. 
मागील आठ ते दहा वर्षापासून आम्ही व्यवसाय करीत आहेत. अतिक्रमण हटविण्यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अचानक कारवाई करण्याला दुकानदारांनी विरोध दर्शविला. यावरुन तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परंतु मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने तणाव निवळला. पथकाने कोणत्याही स्वरुपाची सूचना न देता बांधकामावर जेसीबीचे पंजे मारण्याला सुरुवात केली. यामुळे टिनाचे, दुकानातील साहित्याचे नुकसान होत असल्याने कारवाईला विरोध दर्शविल्याची माहिती दुकानदारांनी दिली. हसनबाग प्रमाणे शहराच्या अन्य भागातही बाजारपेठेतील फूटपाथवर अतिक्रमण आहे. परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही. यात भेदभाव केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. 
दरम्यान प्रवर्तन व बाजार विभागाच्या संयुक्त पथकाने संत्रा मार्केट रेल्वे फिडर रोड येथील मेट्रो रेल्वेच्या बांधकामात बाधा असलेली १८ दुकाने हटविली. यात राम आरसे, राधाबाई धामेचा, कवडु गोंडाणे, शेख शमशुदिन इसाक, देवीदास गुल्हाणे, वासीद अहमद खान, शेख नजीर शेख हुसैन, सैयद कमरअली, शेख उमरदराज व अब्दुल सत्तार, वत्सलाबाई मेश्राम, जगन्नाथ यादव, भयालाल पटेल, कांता सोमकु वर, रामप्यारी गौर, कमलाबाई पारडे, लक्ष्मण माटे, शेख सत्तार शेख मिया, अयुब खान याकूब आदींच्या दुकानांचा समावेश आहे.अतिक्रमण कारवाई प्रवर्तन विभागाचे सहाय आयुक्त अशोक पाटील, झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊ त, संजय कांबळे, बाजार विभागाचे अधीक्षक श्रीकांत वैद्य, बाजार निरीक्षक राजीव पवनकर आदींच्या मार्गदर्शनात करण्यात आली.सूचना न देता कारवाई चुकीचीमागील आठ ते दहा वर्षांपासून हसनबाग परिसरातील दुकानदार व्यवसाय करीत आहेत. अतिक्रमण करण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने पूर्वसूचना दिली असती तर दुकानदारांना टिन व साहित्य काढायला वेळ मिळाला असता. त्यांचे नुकसान झाले नसते. सूचना न देता अचानक कारवाई चुकीची आहे. दबावातून ही कारवाई करणे अयोग्य आहे.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते महापालिका

पोलीस कॉन्स्टेबलला घेतला चावाहसनबाग येथील अतिक्रमण हटविताना जीसीबीच्या समोर आलेल्या  भाजी विक्रेता मो. शकील याला बाजुला करताना त्याने बंदोबस्तावरील पोलीस कॉन्स्टेबल विलीत तांबडे यांना चावा घेतला. शकील याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणने व हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर