शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून नागपुरातील गांधीबागमध्ये तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:44 IST

इतवारीतील एका धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास दोन गट आमने-सामने आले. त्यामुळे गांधीबाग बाजारपेठ परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तहसील पोलिसांनी अत्यंत कौशल्याने प्रकरण हाताळल्याने तीन तासानंतर तणाव निवळला.

ठळक मुद्देदोन गट आमने-सामने : पोलिसांनी कौशल्याने प्रकरण हाताळले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतवारीतील एका धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास दोन गट आमने-सामने आले. त्यामुळे गांधीबाग बाजारपेठ परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तहसील पोलिसांनी अत्यंत कौशल्याने प्रकरण हाताळल्याने तीन तासानंतर तणाव निवळला.अत्यंत वर्दळीचा मानल्या जाणाऱ्या गांधीबागेतील नंगा पुतळा, तीन नळ चौकाजवळ एक धार्मिक स्थळ आहे. या स्थळावरून दोन गटात परस्पर विरोधी सूर असल्याने तेथे नेहमी धुसफूस सुरू असते. आज दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान या स्थळावर टिनशेड उभारण्यासाठी तेथील एकाने आक्रमक भूमिका घेतली. त्याने आणलेल्या १५ ते २० तरुणांनी तेथे टिनचे शेड बनविण्याचे प्रयत्न केले. त्याला काही व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. त्यावरून जोरदार वाद झाल्यानंतर टिनशेड उभारू पाहणाऱ्या तरुणांपैकी काहींनी व्यापाऱ्यांवर हल्ला चढवला. विरोधी गटाकडूनही त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यात आले. त्यामुळे बाजारपेठेत एकच गोंधळ निर्माण झाला. हल्ल्याच्या निषेधार्थ एकत्र आलेल्या व्यापाºयांनी घोषणाबाजी करून आजूबाजूची दुकाने बंद केल्याने तणाव निर्माण झाला. मोठ्या संख्येत व्यापारी आणि शेड उभारणारे तहसील ठाण्यात पोहचले. त्यांनी एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करीत एकमेकांवर कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली. ही वार्ता सर्वत्र पोहचल्याने त्या भागातील काही स्थानिक नेतेमंडळीही पोहचली. ठाणेदार वैभव जाधव यांनी अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दोघांचेही म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांना कारवाई आणि परिणामाची जाणीव करून देण्यात आली. त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात उभारलेले टिनाचे शेड काढून टाकण्यात आले. तब्बल अडीच ते तीन तास पोलिसांनी तेथील परिस्थिती हाताळल्यानंतर वातावरण शांत झाले.तक्रार देण्यास टाळाटाळएकमेकांवर मोठ्या जोरात आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या दोन्ही गटातील मंडळींनी पोलिसांकडे तक्रार देण्याचे मात्र टाळले. मात्र, तहसील पोलिसांनी स्वत:च फिर्यादी बनून टिनशेड उभारून वाद निर्माण करणाऱ्याविरुद्ध रात्री गुन्हा दाखल केला.

टॅग्स :agitationआंदोलनEnchroachmentअतिक्रमण