शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

दसºयाच्या पर्वावर मेट्रोची सोनपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:46 IST

उपराजधानीत दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर मेट्रो रेल्वेची सोनपावले दाखल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत ....

ठळक मुद्दे ‘माझी मेट्रो’ निर्धारित वेळापत्रकानुसार धावणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर मेट्रो रेल्वेची सोनपावले दाखल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत मेट्रो रेल्वेच्या ५.६ कि़मी.च्या पहिल्या ‘ट्रायल रन’ला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.नागपूर मेट्रो रेल्वे तिच्या निर्धारित वेळापत्रकानुसार नागपूरकरांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महामेट्रोच्या मिहान डेपोमध्ये शनिवार, ३० सप्टेंबरला आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कुपाल तुमाने, खा. विकास महात्मे, खा. संजय काकडे, स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, आ. सुधीर पारवे, आ. समीर मेघे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. जोगेंद्र कवाडे, माजी खा. दत्ता मेघे उपस्थित होते. ट्रायल रनचा मान गोंदिया येथील महिला ड्रायव्हर सुमेधा मेश्राम यांना मिळाला.२० हजार जणांना रोजगार मिळणारनागपूरकरांच्या स्वप्नातील ‘माझी मेट्रो’ खºया अर्थाने धावायला लागली आहे. देशात वेळेच्या आत धावणारी पहिली मेट्रो रेल्वे ठरली आहे. मेट्रो हे दळणवळणाचे साधनच नाही तर त्यामुळे शहराचे चित्र बदलणार आहे. त्याकडे आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून पाहिले पाहिजे. या प्रकल्पामुळे जवळपास २० हजार लोकांना रोजगार मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एकत्रितपणा असल्यास शहराची वाहतूक सुरळीत आणि व्यवस्थित होते. शिवाय वाहतुकीवरील ताण कमी होतो. विस्तारीकरणात लोकांच्या सुविधेसाठी मेट्रो कन्हान, बुटीबोरी आणि हिंगणापर्यंत नेण्याचा विचार आहे. पुण्यातील स्वार गेट येथे हब तयार करून वाहतूक व्यवस्थेचा एकत्रित विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जीएसटीमुळे नागपूर लॉजिस्टिक हब बनणारदक्षिण कोरियाच्या दौºयात उपपंतप्रधानांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आर्थिक मदत करण्यास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. जीएसटीमुळे नागपूर हे लॉजिस्टिक हब बनणार आहे. नागपूर विमानतळावर कार्गो हबचा विकास करण्यासाठी सिंगापूर येथील चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकारी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.मेट्रोचा कन्हान, बुटीबोरी, हिंगणापर्यंत विस्तार : गडकरीनितीन गडकरी म्हणाले, नागपूरात मेट्रो रेल्वे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण ३८ कि़मी. धावणार आहे. प्रकल्प वेळेपूर्वीच पूर्ण होत असल्यामुळे यात जवळपास १००० ते १२०० कोटींची बचत होणार आहे. विस्तारीकरणात पुढे ती कन्हान, हिंगणा आणि बुटीबोरीपर्यंत धावणार आहे. नागपूरात अजनी येथे पॅसेंजर हब आणि खापरी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ८०० कोटींच्या गुंतवणुकीतून लॉजिस्टिक हबची निर्मिती करणार आहे. काम लवकरच सुरू होणार आहे. जागेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकरच निर्णय घ्यावा.