शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील महालक्ष्मी जगदंबेचा गाभारा सोन्याचांदीने मढवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 12:17 IST

अश्विन नवरात्रासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थान कोराडी नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे १५ लाख भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विश्वस्त मंडळाने भक्तांसाठी अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न चालविला आहे.

ठळक मुद्देकोराडी देवी मंदिर ९ पासून सुरू पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाळत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अश्विन नवरात्रासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थान कोराडी नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे १५ लाख भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विश्वस्त मंडळाने भक्तांसाठी अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. संस्थानने सुवर्ण मुखवटा व चांदीच्या आयुधासहीत तयार करून जगदंबेला चढविला आहे. आता तर मातेची मूर्ती असलेला संपूर्ण गाभारा सोन्याचांदीत मढवला जात आहे. पोलीस बंदोबस्त चोख राहणार असून हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.प्रमुख मार्गदर्शक व विश्वस्त तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आणि अन्य विश्वस्तांच्या प्रयत्नांनी मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत आहे. कोराडी देवी मंदिर विकास प्रकल्पाचा मूळ आराखडा १८४ कोटींचा होता. आता सुधारित आराखडा २०१ कोटींचा झाला आहे. तसेच टप्पा २ चा आराखडा ९८ कोटींचा आहे. या आराखड्यातून म्युझियम, सभामंडप, रस्ते, बसस्टॉप, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पार्किंग, कॅनॉलवर स्लॅब टाकून भाविकांसाठ़ी रस्ता, या रस्त्याच्या शेजारी सोलर पॅनेल उभे करून मंदिराचा परिसरात सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहे. याशिवाय मंदिराशेजारी असलेल्या भव्य तलावातील गाळ काढून या पाण्यावरून सी प्लेन उडविण्यात येणार आहे. अशी विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे भक्तांना दिसते. या विकास कामांमुळे कोराडी देवी मंदिराचे रूपच पालटणार आहे. पर्यटन आणि तीर्थक्षेत्र अशी संकल्पना येथे राबविण्यात आली आहे. यामुळे सुरक्षित पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचे पावित्र्य कायम राहणार आहे.सध्या कोराडी मंदिर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कार्ये आणि जीर्णोध्दार सुरू आहे. मंदिर व्यवस्थापनाने आपले सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन निराधार वृध्दांसाठी एक सर्व सुविधायुक्त वृध्दाश्रम निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिला आणि पुरुषांसाठ़ी स्वतंत्रपणे निर्माण होणऱ्या वृध्दाश्रमात एकूण ७० वृध्दांची व्यवस्था होईल. तसेच मंदिर परिसरात दिव्यांगांसाठी अपंग पुनर्वसन केंद्राचे निर्माण केले जात आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यावेळी यावेळी संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.मुकेश शर्मा, सचिव केशवराव फुलझेले, विश्वस्त प्रेमलाल पटेल, बाबूराव भोयर, दत्त समरितकर, दयाराम तडसरकर आदी उपस्थित होते.

दररोज ५०० लोकांना अल्प दरात भोजनमानवसेवा म्हणून श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानने दररोज ५०० लोकांना अत्यंत कमी किमतीत पोटभर जेवण उपलब्ध करून देण्याच निर्णय घेतला आहे. समाजातील अनाथ मुलांना आधार मिळावा म्हणून मंदिर व्यवस्थापनाने सर्व सुविधायुक्त अनाथालयाचे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री