शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

तापमान वाढतेय, शाळा बंद ठेवा! नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:26 IST

उन्हाचा पारा ४५ वर पोहचला आहे. सकाळपासूनच ऊन जाणवायला लागले आहे. शरीर भाजणाऱ्या या उन्हामुळे प्रत्येक जीव होरपळत आहे. हवामान खात्याने आठवडाभर उष्णतेची लाट जिल्ह्यात राहील, असा अंदाज वर्तविला आहे. त्याचा धसका जिल्हा प्रशासनाने घेतला असून शालेय विद्यार्थी उष्माघाताचे बळी पडू नयेत म्हणून शाळा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट, हवामान खात्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाचा पारा ४५ वर पोहचला आहे. सकाळपासूनच ऊन जाणवायला लागले आहे. शरीर भाजणाऱ्या या उन्हामुळे प्रत्येक जीव होरपळत आहे. हवामान खात्याने आठवडाभर उष्णतेची लाट जिल्ह्यात राहील, असा अंदाज वर्तविला आहे. त्याचा धसका जिल्हा प्रशासनाने घेतला असून शालेय विद्यार्थी उष्माघाताचे बळी पडू नयेत म्हणून शाळा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.हवामान खात्याने विदर्भात उन्हाळा अधिक तापणार असून, येणाऱ्या दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा परिणाम आरोग्यावर पडण्याचे संकेत आहेत. तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहचल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो. या दृष्टिकोनातून तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रातून मे महिन्यात सर्व शासकीय, अशासकीय, खासगी शाळा व विद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त वर्ग किंवा परीक्षा घेण्याची आवश्यकता असल्यास सकाळच्या सत्रात ११ वाजेपर्यंत आटोपण्याचे आदेश दिले आहेत. या सूचना त्यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, महापालिका व सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळांना दिल्या आहेत.सर्व शाळांना देणार सूचनाजिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व अनुदानित, विना अनुदानित, जिल्हा परिषद शाळांच्या परीक्षा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपल्या आहे. निकाल १ मेपर्यंत लागल्यानंतर शाळांना २६ जूनपर्यंत सुट्या आहेत. पण ज्या शाळा उन्हाळ्याच्या दिवसात अतिरिक्त वर्ग घेण्यास इच्छुक असतात. अशा शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार अतिरिक्त वर्ग सकाळी १० च्या आत घेण्यासंदर्भात शिक्षण विभाग स्वतंत्र पत्र काढणार आहे.शिवलिंग पटले, शिक्षणाधिकारी, माध्यमिकसीबीएसई शाळांकडून दखल नाहीमहाराष्ट्र शासनाचे नियम सीबीएसईच्या शाळा लागू करून घेत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी सीबीएसई शाळेत होणार नाही. सीबीएसई शाळांमध्ये ९ आणि १० वर्गाचे क्लासेस सुरू आहेत. दुपारी १ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना शिकविले जाते. सीबीएसईच्या शाळा महाराष्ट्र शासनाच्या नियमांना मानत नसल्याचा आरोप सीबीएससी स्कूल स्टाफ वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्ष दीपाली डबली यांनी केला आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयातही विचारणा केली असता, सीबीएससी शाळा आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयTemperatureतापमानSchoolशाळा