शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  टेकडी गणेश मंदिरासाठी आता सरळ मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:09 IST

टेकडीच्या मंदिरासमोर झालेल्या उड्डाण पुलामुळे रस्ता वनवे झाला आहे. त्यातच टेकडी समोरील रेल्वेस्टेशन, मध्य प्रदेश परिवहन विभागाचे बसस्टॅण्ड, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे विभागीय कार्यालय असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. हा त्रास लवकरच कमी होणार आहे. मानस चौकातील सुभाष पुतळ्याच्या मागून थेट मंदिरापर्यंत २० मीटर रुंदीचा रस्ता बणनार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसंरक्षण मंत्रालयाने दिली १ एकर जागा : सुभाष पुतळ्याच्या मागून बनणार २० मीटरचा रोड

लोकमत विशेषनागपूर : टेकडीच्या मंदिरासमोर झालेल्या उड्डाण पुलामुळे रस्ता वनवे झाला आहे. त्यातच टेकडी समोरील रेल्वेस्टेशन, मध्य प्रदेश परिवहन विभागाचे बसस्टॅण्ड, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे विभागीय कार्यालय असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. हा त्रास लवकरच कमी होणार आहे. मानस चौकातील सुभाष पुतळ्याच्या मागून थेट मंदिरापर्यंत २० मीटर रुंदीचा रस्ता बणनार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती आहे.शिवाय मंदिरात वाहनांच्या पार्किंगची जागा सुद्धा अपुरी असल्याने खास मंदिराच्या पार्र्किंगसाठी एक एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. मंदिराचे संचालन करणारी ‘द अ‍ॅडव्हायजरी सोसायटी ऑफ गणेश टेम्पल’ ची गेल्या १० वर्षापासूनची ही मागणी होती. ३१ जानेवारी २०१५ ला यासंदर्भातील प्रस्ताव तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना दिले होते. तेव्हापासून समितीचा पाठपुरावा सुरू होता. विद्यमान संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी टेकडी गणेश मंदिराचा मार्ग सुकर केला आहे. संरक्षण मंत्रालय ही जागा मनपाच्या स्वाधीन करणार आहे. मनपा जागेचे हस्तांतरण टेकडी गणेश मंदिराला करणार आहे.विशेष म्हणजे सणांच्या काळात गणेश मंदिरासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. मंदिरात येणारा ८५ टक्के भाविक हा मानस चौकाकडून येतो. भाविकाला उड्डाण पुलाला वळण देऊन, रेल्वेस्थानकासमोरून यावे लागते. या रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने भाविकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. मंदिराकडे असलेली पार्किंगची जागा सुद्धा अपुरी असल्याने, मंदिरासमोरील शाळेत पार्किंगची सोय करण्यात येते. काही लोक रस्त्यावरच वाहने पार्किंग करतात. हा त्रास लवकरच संपणार असल्याचे समितीचे म्हणणे आहे. खरे श्रेय गडकरींचेसंरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याचे खरे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाते. त्यांनी १७ मे २०१५ रोजी मनोहर पर्रीकर यांना मंदिरात आणले होते. नागपूरकरांसाठी मंदिर किती श्रद्धेय आहे, याची प्रचिती करून दिली होती. पर्रीकर यांच्यानंतर निर्मला सीतारामण यांच्याकडेही त्यांनी पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. मंदिरासाठी पुलाच्या समांतर असा २० मीटर रुंद व १९० मीटर लांबीचा रस्ता बनणार आहे. भाविकांसाठी पार्किंगची सुद्धा सोय होणार आहे.श्रीरंग कुळकर्णी, सचिव, द अ‍ॅडव्हायजरी सोसायटी ऑफ गणेश टेम्पल

टॅग्स :Tekdi Ganesh Mandirटेकडी गणेश मंदिरnagpurनागपूर