शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

 नागपुरात तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:25 IST

परीक्षेतील अपयशामुळे नैराश्य आल्याने तंत्रनिकेतन (पालिटेक्निक) च्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी पारडीतील उपरे मोहल्ल्यात घडलेल्या या घटनेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देनैराश्यामुळे लावला गळफास : पारडीतील घटनेने परिसरात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परीक्षेतील अपयशामुळे नैराश्य आल्याने तंत्रनिकेतन (पालिटेक्निक) च्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी पारडीतील उपरे मोहल्ल्यात घडलेल्या या घटनेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.कोमल कैलाश चहांदे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती केडीके कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्षाला शिकत होती. परिसरातील चर्चेनुसार, काही दिवसांपासून कोमल तासन्तास मोबाईलमध्ये गुंतून राहायची. त्यामुळे तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी ती तीन विषयात अनुत्तीर्ण झाली होती. यामुळे तिला नैराश्य आले होते. ती अलिकडे सारखी नाराज राहायची. मोबाईल अन् ती एवढेच तिचे विश्व झाले होते. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोमल तिच्या घराच्या टेरेसवर गेली. बराच वेळ होऊनही ती खाली आली नाही. त्यामुळे खालच्या रूममध्ये असलेल्या आईने कोमलच्या मोठ्या बहिणीला काजलला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास टेरेसवर पाठविले. यावेळी कोमल तिला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. काजलने आरडाओरड केल्यामुळे तिची आई धावत आली. शेजारीही गोळा झाले. त्यांनी कोमलच्या गळ्यातील फास काढला. तिला खाली नेण्यात आले. घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी तिच्यावर प्रथमोपचार करण्याचे प्रयत्न केले. मात्र, कोमल निपचित पडून असल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे एकाने पारडी पोलिसांना माहिती कळविली. ठाणेदार सुनील चव्हाण यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. कोमलची आई आणि बहीण काजल यांनी दिलेल्या माहितीवरून पारडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. परीक्षेत आलेल्या अपयशामुळे नैराश्य येऊन कोमलने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे ठाणेदार चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र, खरे कारण शोधण्यासाठी सर्व बाजू तपासल्या जात असल्याचेही चव्हाण म्हणाले.पबजीने केला घात ?कोमलला पबजी खेळण्याची सवय लागली होती. ती तासन्तास पबजीत गुंतून राहायची. त्यामुळे तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले अन् त्याचमुळे तिला नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र, असे काहीही प्राथमिक तपासात पुढे आले नाही, असे पारडीचे पोलीस सांगतात.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी