शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

एअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानात तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 20:02 IST

मंगळवारी सकाळी मुंबई  येथून नागपूर येथे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. दुरुस्तीनंतरही विमान उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याचे लक्षात आल्यावर, प्रवाशांना एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानात स्थानांतरित करून नागपुरात आणण्यात आले. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना तब्बल पाच तास विमानातच अडकून राहावे लागले.

ठळक मुद्दे प्रवासी तब्बल पाच तास अडकले : दुसऱ्या विमानाने पोहचविले नागपुरात

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी सकाळी मुंबई  येथून नागपूर येथे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. दुरुस्तीनंतरही विमान उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याचे लक्षात आल्यावर, प्रवाशांना एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानात स्थानांतरित करून नागपुरात आणण्यात आले. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना तब्बल पाच तास विमानातच अडकून राहावे लागले.एअर इंडियाचे ‘एआय ६२७’ हे विमान मंगळवारी सकाळी ५.४५ वाजता मुंबईहून नागपूरसाठी उडणार होते. विमानात सुमारे १०० प्रवासी होते. सकाळी ५.१५ वाजता बोर्डिंग आटोपल्यावर विमान ‘रन-वे’कडे निघाले असता, त्यात तांत्रिक बिघाड असल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे विमान रन-वेवर न नेता तेथेच थांबविण्यात आले व तांत्रिक दुरुस्ती केली जात असल्याचे सांगण्यात आले. सकाळी ७.३० पर्यंत दुरुस्ती सुरू राहिल्यानंतर संबंधित विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याची घोषणा पायलटने केली. प्रवाशांना दुसºया फ्लाईटमध्ये शिफ्ट केले जाईल, असेही सांगण्यात आले. यानंतर अर्ध्या तासाने ८.०५ वाजता एअर इंडियाचे दुसरे विमान लावण्यात आले व त्यात प्रवाशांना स्थानांतरित करण्यात आले. ८.४० वाजता विमानाने उड्डाण घेतले व सकाळी १०.१० वाजता नागपूर विमानतळावर पोहचले.विमानाला विलंब होत असल्यामुळे सुरुवातीचे दोन तास प्रवाशांनी संयम बाळगला; नंतर मात्र, नेमके काय सुरू आहे, अशी विचारणा रनिंग स्टाफकडे केली. प्रवाशांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केल्यानंतर लगेच सूत्रे हलली व दुसऱ्या विमानाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे सकाळी ७.१५ वाजता नागपुरात पोहचणार असलेले प्रवासी १०.१५ वाजता पोहचले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर