शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी नागपुरात येणार तज्ञांची चमू : गृहमंत्री अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 02:36 IST

नागपूर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडा मुंबईच्या इतर भागातील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्या तज्ज्ञांनी उपाययोजना केल्या ती चमू येत्या ४ सप्टेंबरला नागपुरात येणार आहे. ही चमू विभागीय आयुक्त कार्यालय येथे दुपारी १२ वाजता नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या सोबत केलेल्या चर्चेनंतर निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडा मुंबईच्या इतर भागातील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्या तज्ज्ञांनी उपाययोजना केल्या ती चमू येत्या ४ सप्टेंबरला नागपुरात येणार आहे. ही चमू विभागीय आयुक्त कार्यालय येथे दुपारी १२ वाजता नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.या तज्ज्ञ चमूमध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांचासह डॉ. ओम श्रीवास्तव (संक्रमक रोग विशेषज्ञ), डॉ. राहुल पंडित (गंभीर रोग विशेषज्ञ), डॉ मुफझल लकडावाला (जनरल सर्जन), डॉ गौरव चतुर्वेदी (कान नाक घसा विशेषज्ञ ) यांच्यासह इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.मुंबई येथील हॉटस्पॉट ठरलेल्या कोळीवाडा व धारावी मुंबईच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण निघत होते. परंतु आता येथील परिस्थिती अगदी सामान्य झाली आहे. त्याच पद्धतीने किंबहुना त्यापेक्षाही जास्त आता नागपूर शहरात व ग्रामीण भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. स्थानिक प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचे काम करीत आहे.ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडासह मुंबईतील इतर भागात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी प्रयत्न केले त्याच धर्तीवर त्यांचा अनुभव घेऊन नागपुरात काय उपाययोजना कराव्या लागतील याची चर्चा या बैठकीत होणार आहे. नागपूर येथील परिस्थिती कशी हाताळायची यावर ते मार्गदर्शन करतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुख