शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे सर्व्हिस बुक होणार आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:57 IST

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेची संपूर्ण माहिती देणारे माध्यम म्हणजे त्यांचे सर्व्हिस बुक होय. जुन्या पोथीसारखे दिसणारे हे ‘सर्व्हिस बुक’ आता अस्तित्वहीन होणार आहे. कारण शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांची सर्व सेवापुस्तिका आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका आॅनलाईन झाल्यानंतर आता शालार्थ अर्थात शिक्षकांची सेवापुस्तिका आॅनलाईन करण्याची प्रक्रिया जि.प.मध्ये सुरू झाली आहे.

ठळक मुद्देकागदी प्रक्रियेला आळा : पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेची संपूर्ण माहिती देणारे माध्यम म्हणजे त्यांचे सर्व्हिस बुक होय. जुन्या पोथीसारखे दिसणारे हे ‘सर्व्हिस बुक’ आता अस्तित्वहीन होणार आहे. कारण शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांची सर्व सेवापुस्तिका आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका आॅनलाईन झाल्यानंतर आता शालार्थ अर्थात शिक्षकांची सेवापुस्तिका आॅनलाईन करण्याची प्रक्रिया जि.प.मध्ये सुरू झाली आहे.कर्मचारी नोकरीत लागल्यापासून तो निवृत्त होईपर्यंत प्रमोशन, ग्रेड पे, त्याच्यावर झालेल्या कारवाई इत्थंभूत माहिती सेवापुस्तिकेत नोंदविली जाते. त्यामुळे शासकीय विभागामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेचे गठ्ठे पडलेले असतात. कधी कधी त्या गहाळ सुद्धा होतात. यावर उपाय म्हणून सरकारने आता हे ‘सर्व्हिस बुक’ आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व्हिस बुकमधील सगळी माहिती आता आॅनलाईन सेव्ह राहणार असून सरकारी कर्मचाºयांना सुटीचा अर्जसुद्धा आॅनलाईन टाकावा लागणार आहे. केंद्र व राज्य सरकारने ई-गव्हर्नन्सवर भर देण्यासाठी अनेक प्रणाली आॅनलाईन केल्या आहेत. यात निविदा प्रक्रियेपासून सेवार्थ प्रणालीपर्यंत सगळ्या प्रणाली आॅनलाईन केल्या जात आहे. आता ‘सर्व्हिस बुक’ सुद्धा आॅनलाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागपूर जिल्हा परिषदेतून या योजनेचा शुभारंभ होत आहे. पारदर्शकता वाढणारकर्मचाऱ्याच्या नियुक्तीचा आणि सेवानिवृत्तीची दिनांक, कोणत्या वर्गात नियुक्ती झाली, पगारवाढीची माहिती, कर्मचाऱ्याविरुद्ध झालेल्या चौकशी कारवाईंची माहिती, त्याने घेतलेल्या सुट्यांची माहिती सर्व्हिस बुकमध्ये नोंदविली जाते. हे सर्व्हिस बुक अनेकदा जुने आणि जीर्ण होते. परंतु आता हे आॅनलाईन केल्यास ही समस्या सुटणार आहे. तसेच सर्व्हिस बुक आॅनलाईन असल्याने त्यात खोडतोड करून बॅकडेट एन्ट्री करणे शक्य होणार नसून कामाची पारदर्शकता वाढणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली कार्यशाळाजिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या ई-सर्विस बुकचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. आता शिक्षकांच्या सर्विस बुकचे काम सुरू करण्याचा निर्णय जि.प. प्रशासनाने घेतला आहे. मानव संपदा कार्यक्रमांतर्गत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील १३ ब्लॉकचे गटशिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची कार्यशाळा पार पडली. २८ आॅगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत शिक्षकांकडून फॉर्म भरून घेण्यात येणार आहे. त्यानंतर आॅनलाईन डाटा एन्ट्रीचे काम सुरू होणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकonlineऑनलाइन