शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक करताहेत शेतमजुरी, फुड डिलेव्हरी : सात वर्षांपासून वेतनवंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 19:22 IST

ज्ञानेश्वर निनावे हे बीए बीएड् आहेत. नंदनवन येथील महालक्ष्मी विद्यालयात ते विशेष शिक्षक म्हणून २०११ ला रुजू झाले. मात्र अजूनही त्यांना वेतन मिळालेले नाही. नरखेड येथील अमित राठोड हे एमए बीएड् आहे. गुरुमहाराज आदिवासी विद्यालयात ते विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या शिक्षकांना पगारच नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी शाळा सुटल्यावर त्यांना ‘फुड डिलेव्हरी’चे, शेतीवर किंवा इतरही कामे करावी लागत आहेत. ज्ञानेश्वर किंवा अमित यांच्यासारखे शेकडो अपंग समावेशीत विशेष शिक्षकांच्या या अवस्थेला शासन दोषी ठरत आहे. २००९ पासून शासनाने या शिक्षकांना रुजू केले. मात्र वेतनच दिले नाही.

ठळक मुद्देअपंग समावेशित विशेष शिक्षकांची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्ञानेश्वर निनावे हे बीए बीएड् आहेत. नंदनवन येथील महालक्ष्मी विद्यालयात ते विशेष शिक्षक म्हणून २०११ ला रुजू झाले. मात्र अजूनही त्यांना वेतन मिळालेले नाही. नरखेड येथील अमित राठोड हे एमए बीएड् आहे. गुरुमहाराज आदिवासी विद्यालयात ते विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या शिक्षकांना पगारच नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी शाळा सुटल्यावर त्यांना ‘फुड डिलेव्हरी’चे, शेतीवर किंवा इतरही कामे करावी लागत आहेत. ज्ञानेश्वर किंवा अमित यांच्यासारखे शेकडो अपंग समावेशीत विशेष शिक्षकांच्या या अवस्थेला शासन दोषी ठरत आहे. २००९ पासून शासनाने या शिक्षकांना रुजू केले. मात्र वेतनच दिले नाही.सामान्य शाळांंमध्ये शिक्षणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढविण्यासाठी शासनाने अपंग समावेशित शिक्षण योजनेत राज्यात १३५८ शिक्षकांची नियुक्ती केली. सामान्य शाळेतील अप्रगत मुलांना हे शिक्षक विशेष वर्ग घेऊन अध्यापनाचे कार्य करीत होते. या शिक्षकांना सामान्य माध्यमिक शिक्षकाच्या सर्व सेवा शर्ती आणि वेतन श्रेणी लागू आहे. २००९ ते २०१५ पर्यंत हे विशेष शिक्षक वेतन मिळत नसतानाही नियमित कार्यरत होते. पण २०१५ मध्ये शासनाने या शिक्षकांची सेवासमाप्त करण्याचे आदेश दिले. याविरुद्ध अपंग समावेशीत विशेष शिक्षक कृती समितीने औरंगाबाद खंडपीठात शासनाकडून झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागितली. न्यायालयाने शासनाचे सेवासमाप्तीचे आदेश रद्द करून, शिक्षकांची सेवा पुनर्स्थापित करण्याचे निर्देश दिले.न्यायालयाच्या निर्देशान्वये शासनाने २०१७ मध्ये विशेष शिक्षकांना पुन्हा स्थापित केले. पण त्यांचे समायोजन आणि वेतनासंदर्भात कुठलीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे गेल्या ४० दिवसांपासून हे विशेष शिक्षक संविधान चौकात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी बसलेले आहेत. यादरम्यान त्यांच्या तीन भेटी मुख्यमंत्र्यांशी झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिक्षण आयुक्तांना समायोजनाचे आदेश दिले. शिक्षकांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यास सांगितले. पण आयुक्ती मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून, विशेष शिक्षकांची तपासणी सुरू केली. पुन्हा या शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा आयुक्तांना आदेश दिले. पण शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे पाठ दाखवित असल्याचा आरोप शिक्षक कृती समितीने केला आहे.आजपर्यंत या शिक्षकांनी ५० वर आंदोलन केले आहे. दरम्यान ११ शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत.

 

टॅग्स :Teacherशिक्षकnagpurनागपूर