शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

शिक्षक दिन विशेष; जीवनातील प्रत्येक टप्प्यात शिक्षकांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 11:12 IST

माझे आई-वडील. माझ्या जीवनातील सर्वात पहिले शिक्षक होत. त्यांच्यामुळेच आज मी सनदी अधिकारी होऊ शकलो. नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आपल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या जीवनाला अनेक शिक्षकांमुळे मिळाला आकार, संस्कार व नैतिक मूल्यांची मिळाली शिकवण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात मला अनेक चांगले शिक्षक लाभले. त्यांच्यामुळे मला खूप काही शिकता आले. संतोष त्यागी, ज्ञानसिंग कौरव, सुभाष जैन, विनय सिंग यासारख्या शिक्षकांनी केवळ शालेय अभ्यासक्रमच शिकवला नाही, तर हसतखेळत कसे शिकता येते, याचा परिपाठ घालून दिला. जीवनात नैतिक मूल्य आणि संस्कार दिले. शिस्त शिकवली. नैतिक मूल्य, संस्कार आणि या शिस्तीच्या भरवशावर आज मी उभा आहे. त्यामुळे या सर्व शिक्षकांचे माझ्या जीवनात अमूल्य असे योगदान आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे आई-वडील. माझ्या जीवनातील सर्वात पहिले शिक्षक होत. त्यांच्यामुळेच आज मी सनदी अधिकारी होऊ शकलो. नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आपल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त केल्यात.

शिक्षकांचा मार आणि शिस्तीचा धडाआम्ही तेव्हा नवव्या वर्गात शिकत होतो. त्या काळात शिक्षकांचा मार म्हणजे भयंकर असायचा. मीसुद्धा अनेकदा मार खाल्ला आहे. परंतु शिक्षकांचा तो मार मला संस्कारीत करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. एकदा आमची सहल दुसऱ्या शहरात गेली होती. तेव्हा रात्री खूप उशीर झाला. सकाळी लवकर उठणे आवश्यक होते. परंतु कुणीही उठले नाही. तेव्हा माझे शिक्षक संतोष गौड हे आमच्यासोबत होते. ते सकाळी आमच्या खोलीत आले तेव्हा कुणीच उठले नसल्याचे पाहून त्यांनी आम्हा सर्वांना मारतच उठवले. त्यांनी आम्हाला मारले परंतु त्यांनाही फार वाईट वाटत होते.तेव्हा त्यांनी आम्हाला शालेय जीवनात शिस्त, वेळेचे महत्त्व समजावून सांगितले. आज तुम्ही वेळेवर उठले नाही, तर ही सवय होईल, आणि ती तुमच्या यशाच्या वाटेत बाधक ठरेल. ही बाब पटवून दिली. आम्ही लवकर उठू शकलो नाही, याचे आम्हालाही वाईट वाटत होते. त्यावेळी आम्हाला टाइम मॅनेजमेंट, अनुशासन हे समजले. दुसºया दिवशी आम्ही सर्व वेळेत उठलो. त्यावेळी त्यांनी दिलेला मार आजही मला अनुशासन आणि वेळेचे महत्त्व पटवून देत असतो.

आणि मी विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ लागलो !अगोदर अभ्यास म्हणजे रट्टा मारणे असेच होते. आम्ही केवळ रट्टा मारायचो. आठव्या वर्गापर्यंत असेच चालले. परंतु नववीमध्ये संतोष त्यागी नावाचे शिक्षक आले. ते विज्ञान हा विषय अतिशय सोप्या आणि सहज भाषेत समजावून सांगायचे. त्यांच्यामुळेच मला विज्ञानासह इतर विषयाची गोडी निर्माण झाली. मी अधिक चांगल्या पद्धतीने विषय समजू लागलो. तसेच कौरव सरांचा नैतिक मूल्य यावर अधिक भर राहायचा. विनय सिंग यांनी मला यूपीएससीची तयारी करण्यात खूप मदत केली.माझी आई सुषमा सोशियोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहे. ती महिला बालविकास अधिकारी होती. नंतर तिने ती नोकरी सोडली. वडील डॉ. अशोक मुदगल हे बालरोगतज्ज्ञ आहेत. शाळेत शिक्षक शिकवत होतेच. परंतु माझ्या आईवडिलांचे माझ्या शिक्षणाकडे बारीक लक्ष असायचे. त्यातही माझी आई मी सनदी अधिकारी व्हावे, याकडे विशेष लक्ष देत होती. त्यासाठी ती अगोदरपासूनच त्यासंबंधीची पुस्तके मला आणून द्यायची. काय वाचायला हवे, कसा अभ्यास करायचा, हे ती सुरुवातीपासूनच सांगायची. तशी तयारीही माझ्याकडून करून घ्यायची. तिच्यामुळेच मी जिल्हाधिकारी होऊ शकलो.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिन