शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदार संघ: नागपूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला, शिवसेना घेणार माघार!

By कमलेश वानखेडे | Updated: January 15, 2023 23:38 IST

महाविकास आघाडीच्या नेत्यांची रविवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चर्चा

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची जागा अखेर शिवसेनेच्या जबड्यातून हिसकावून काँग्रेसच्या वाट्याला येण्याची चिन्हे आहेत. रविवारी रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत नागपूरची जागा काँग्रेसला सोडण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. सोमवारी दुपारी याची अधिकृत घोषणा होईल व शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल असा दावा काँग्रेस मधील सूत्रांनी केला आहे.

११ जानेवारी रोजी महाविकास आघाडीच्या मुंबईच्या बैठकीत नागपूरची जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी  १२ जानेवारी रोजी उमेदवारी अर्जाला शिवसेनेचा एबी फॉर्म जोडला. मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरची जागा शिवसेनेला सोडली नसल्याचे स्पष्ट करीत १५ जानेवारी रोजी मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होईल व त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार रविवारी बैठक होणे अपेक्षित होते. मात्र काही कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यामुळे पटोले हे मुंबईला गेलेच नाही. ते दिवसभर गडचिरोली व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. इकडे महाविकास आघाडीची बैठक होईल व काहीतरी तोडगा निघेल या आशेवर सर्वांच्या नजरा मुंबईकडे लागल्या होत्या. मात्र दिवसभर बैठकच न झाल्याने इच्छुकांसह कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. शेवटी सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रमुख नेत्यांची बैठक होईल, असे सांगण्यात आले.

शेवटी रात्री साडे नऊच्या सुमारास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. या चर्चेत नाना पटोले यांनी नाशिकची जागा शिवसेनेला सोडली असल्यामुळे नागपूरची जागा काँग्रेसला सोडावी असा आग्रह धरला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चर्चेअंती पटोली यांची मागणी मान्य करण्यात आली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी ठोस उत्तर दिले नाही. मात्र, नागपूरची जागा काँग्रेसला मिळेल असा विश्वास व्यक्त केला. सोमवारी सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा चर्चा होईल व त्यानंतर घोषणा केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस अडबाले यांना समर्थन देणार ?- नागपूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यास काँग्रेसकडून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन दिले जाण्याची जास्त शक्यता आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते नैसर्गिक युतीचा हवाला देत अडबाले यांना समर्थन देण्यासाठी आग्रही आहेत. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी काँग्रेस नेत्यांकडे केली आहे. मात्र काँग्रेस कडून शब्द पाळण्याची शक्यता कमीच आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूक