शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑफलाईन’ बदल्यांवर गुरुजी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 21:14 IST

ऑफलाईन बदल्यांमध्ये होत असलेल्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने २०१८ पासून शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन सुरू केल्या. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने शिक्षकांच्या बदल्या पुन्हा ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला. यंत्या ३१ जुलैपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. यावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे३१ जुलैपूर्वी बदल्या करण्याचे शासनाचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ऑफलाईन बदल्यांमध्ये होत असलेल्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने २०१८ पासून शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन सुरू केल्या. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने शिक्षकांच्या बदल्या पुन्हा ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला. यंत्या ३१ जुलैपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. यावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.विशेष म्हणजे यंदा १५ टक्के मर्यादा राखूनच बदल्या होणार आहे. नागपूर जिल्ह्यात जि.प.चे ४ हजार ६०० वर शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांच्या स्थानिक प्रशासनाकडून होणाऱ्या बदल्या नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. त्यामुळेच २०१८ पासून मंत्रायलस्तरावरुन ऑनलाईन बदल्या करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यावर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे वित्त विभागाने बदल्यांना स्थगिती दिली होती. पण सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्याही बदल्या करण्याचा निर्णय घेतला. बदल्यांच्या धास्तीने शिक्षकांची धाकधूक वाढली होती. यात जिल्ह्यांतर्गत बदल्या ह्या ऑनलाईन व आंतरजिल्हा बदल्या या स्थानिक पातळीवरुनच ऑफलाईन होणार आहे.नागपूर जिप मध्ये २०१९ मध्ये झालेल्या बदल्यांचे आदेश प्रलंबित आहेत. २०१८ च्या बदल्यांमध्ये रँडम व विस्थापित झालेल्या शिक्षकांबाबत शासन निर्णयाची नागपूर जिप मध्ये अंमलबजावणी नाही. वित्त विभागाने यंदा बदल्यांना स्थगिती दिली होती. राज्यातील एकाही संघटनेने ऑनलाईन बदलीला विरोध केला नसताना ऑफलाईन बदल्यांची शिफारस कुणी केली, असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.शरद भांडारकर, राज्य सरचिटणीस, मनसे शिक्षक व शिक्षकेतर सेनाशिक्षण क्षेत्र गोंधळात असताना बदल्या का?कोरोनामुळे अख्खे शिक्षण क्षेत्र गोंधळात आहे. शाळा सुरू होईल का नाही, याबाबत साशंकता आहे. गुरुजींच्या उपस्थितीबद्दल अजूनही प्रश्न सुटलेला नाही. हा संपूर्ण गोंधळ सुरू असताना, शासन गुरुजींच्या बदल्या करीत आहे. या बदल्यांच्या प्रक्रियेतही गोंधळ उडणार आहे. कारण ऑफलाईन बदल्यांसाठी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो तर ऑनलाईनच्या निकषानुसार बदल्या केल्यास गोंधळ उडणार आहे.परसराम गोंडाणे, मुख्य संघटन सचिव, कास्ट्राईब शिक्षक संघटना

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली