शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

४०० स्थानकांवर ‘कुल्हड’मधून चहा; रेल्वेला पाठविला प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 06:18 IST

देशातील तब्बल ४०० रेल्वेस्थानकांवर लवकरच मातीच्या कुल्हडमधून चहा-कॉफी मिळणार आहे.

नागपूर : देशातील तब्बल ४०० रेल्वेस्थानकांवर लवकरच मातीच्या कुल्हडमधून चहा-कॉफी मिळणार आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्यास अंतिम मंजुरी मिळेल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत दिली.देशातील तब्बल ४०० रेल्वेस्थानकांवर लवकरच मातीच्या कुल्हडमधून चहा-कॉफी मिळणार आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्यास अंतिम मंजुरी मिळेल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

कुल्हड मातीपासून बनविले जात असल्याने चहा-कॉफीची नैसर्गिक चव कायम राहते. शिवाय वापरलेल्या कुल्हडच्या मातीतून परत नवीन कुल्हड तयार होऊ शकतात. यामुळे पर्यावरणाचेदेखील संवर्धन होते. लवकरच ४०० रेल्वे स्थानकांवर कुल्हड अनिवार्य होतील, असे गडकरी यांनी सांगितले. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यावर भर राहणार आहे. मंत्रालयातर्फे ‘भारतक्राफ्ट’ नावाचे ई- कॉमर्स संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. दोन वर्षांत या संकेतस्थळाच्या माध्यमातून १० लाख कोटींची उलाढाल करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.‘नॅपीअर’ गवतापासून ‘बायो सीएनजी’‘नॅपीअर’ गवतापासून ‘बायो सीएनजी’ची निर्मिती करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे या गवताचे उत्पादन केले जाईल. नागपूर महानगरपालिकेच्या ५० बसेस बायो सीएनजीवर चालविल्या जातात. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात जट्रोफा या जैवइंधनाच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या बिया वाटपाचाही कार्यक्रम सुरूकरण्यात आला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेNitin Gadkariनितीन गडकरीpiyush goyalपीयुष गोयल