शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

टीसीच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलगा सापडला, भवितव्य अंधकारमय होण्यापासून बचावले

By नरेश डोंगरे | Updated: March 3, 2023 20:06 IST

उत्तर प्रदेशमधील मुलगा, रागाच्या भरात पळून आला.

नागपूर : रागाच्या भरात घर सोडून पळून आलेला उत्तर प्रदेशातील एक अल्पवयीन मुलगा तिकिट तपासणीसांच्या सतर्कतेमुळे चाईल्ड लाईनच्या हाती लागला. त्याला सध्या येथील शासकीय बालगृहात ठेवण्यात आले असून, त्याचे पालक येथे आल्यानंतर त्याला त्यांच्या स्वाधिन केले जाणार आहे.

बिनू (वय १४, नाव काल्पनिक) हा मुरादाबाद (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी होय. रागाच्या भरात तीन दिवसांपूर्वी त्याने घर सोडले. तो दिल्लीला आला आणि तेथील रेल्वेस्थानकावरून तो दिल्ली चेन्नई एक्सप्रेसमध्ये बसला. जनरल डब्यात टीसी अमोल अन्विकर हे तिकिट तपासणी करत असताना गुरुवारी सकाळी बिनू त्यांच्या नजरेस पडला.

विनातिकिट असल्यामुळे तो घाबरला. आपल्याला आता टीसी पोलिसांच्या हवाली करतील, याची कल्पना आल्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याची ती अवस्था ध्यानात आल्याने टीसी अन्विकर यांनी त्याला विश्वासात घेतले. त्याला नागपूर रेल्वेस्थानकावर उतरवून घेतल्यानंतर त्याची आस्थेने विचारपूस केली. फलाट क्रमांक दोनवर त्याला खाऊपिऊ घातले. दरम्यान, चाईल्ड लाईनच्या सदस्यांच्या उपस्थितीत विचारपूस करण्यात आल्यानंतर बिनूने घरून पळून आल्याचे सांगितले.

आपल्या पालकांचा पत्ता अन् संपर्क क्रमांकही सांगितला. त्यावरून चाईल्ड लाईनने रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून बिनूच्या पालकांशी संपर्क साधला. परिस्थितीमुळे त्यांना येण्यास दोन ते तीन दिवस विलंब होणार असल्याचे लक्षात आल्यामुळे बिनूला शासकीय बालगृहात ठेवण्यात आले. त्याचे पालक नागपुरात आल्यानंतर बिनूला त्यांच्या हवाली केले जाणार आहे. तिकिट तपासणीस अन्विकर यांच्या सतर्कतेमुळे बिनू पालकांपासून दूर जाण्यापासून बचावला. त्याचे भवितव्य अंधकारमय होण्यापासूनही बचावले.

टॅग्स :nagpurनागपूर