शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विस्तारीकरणात टीसीएसची एक हजार कोटींची गुंतवणूक : हजार युवकांना नव्याने रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 21:40 IST

मिहानमधील टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनी युवकांना रोजगार देण्यात आघाडीवर ठरली आहे. या कंपनीने पुन्हा विस्तारीकरणाची योजना आखली असून त्याअंतर्गत ३५ कोटी रुपये अदा करून ५० एकर जमीन खरेदी केली आहे. कंपनीत ४५०० जणांना रोजगार मिळाला असून विस्तारीकरणात दुसरे कॅम्पस दोन वर्षांत सुरू झाल्यानंतर आणखी एक हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्दे३५ कोटींत ५० एकर जमिनीची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहानमधील टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनी युवकांना रोजगार देण्यात आघाडीवर ठरली आहे. या कंपनीने पुन्हा विस्तारीकरणाची योजना आखली असून त्याअंतर्गत ३५ कोटी रुपये अदा करून ५० एकर जमीन खरेदी केली आहे. कंपनीत ४५०० जणांना रोजगार मिळाला असून विस्तारीकरणात दुसरे कॅम्पस दोन वर्षांत सुरू झाल्यानंतर आणखी एक हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने लीज कराराचा मसूदा टीसीएसकडे पाठविला आहे. त्यानंतरच करार होणार आहे. पण कंपनीने ७० लाख रुपये एकर दरानुसार ५० एकर जमिनीसाठी ३५ कोटी रुपये अदा केल्यामुळे त्यांना जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. कंपनी तीन महिन्यात विकास कामांना सुरुवात करणार आहे. कंपनीचा पहिल्या टप्प्यातील प्रकल्प ५५ एकर जमिनीवर उभा आहे. त्यामुळे कंपनीकडे १०५ एकर जमीन झाली आहे. सध्या ११ लाख चौरस फूट जागेवर बांधकाम केले आहे.टीसीएसच्या प्रकल्पात जवळपास १० हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. या जागतिक स्तराच्या कंपनीतून मोठ्या कंपन्यांना आयटी सेवा प्रदान करण्यात येत आहे. यामध्ये डिजिटल सॉफ्टवेअर विकास, इंजिनिअरिंग, आयओपी, अ‍ॅनालिटिकल, इंडस्ट्री, बिझनेस सोल्युशन आदी सेवांचा समावेश आहे. टीसीएसने पूर्वी पहिल्या टप्प्यातील युनिटची सुरुवात कॉल सेंटर आणि बीपीओद्वारे केली होती.टीसीएस कंपनीला एल अ‍ॅण्ड टी इन्फोसिसची जागा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. एमआयएलने ही जागा पूर्वी एल अ‍ॅण्ड टीला दिली होती. पण या कंपनीने अनेक वर्षांनंतरही कामाला सुरुवात न केल्यामुळे एमआयएलने जागा परत घेतली. आता ही जागा टीसीएसला देण्यात आल्यामुळे युवकांना रोजगाराची द्वारे खुली होणार आहे. मिहान-सेझमध्ये आतापर्यंत जवळपास ३५ हजार युवकांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती आहे. लवकरच सुरु होणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीत युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.टीसीएसला ५० एकर जमिनीचे हस्तांतरणकंपनीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमआयएल) ३५ कोटी रुपये अदा केल्यानंतरच जमिनीचा ताबा देण्यात आला आहे. लीज कराराचा मसूदा कंपनीकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच मान्यता मिळविण्याची शक्यता आहे. कंपनी तीन महिन्यात काम सुरू करणार आहे. या माध्यमातून एक हजार युवकांना रोजगार मिळणार आहे.सुरेश काकाणी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी.

टॅग्स :Mihanमिहानnagpurनागपूर