शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात टँकरचा पाणीपुरवठा महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:08 IST

डिसेंबर २०१८ पर्यंत नागपूर शहर टँकरमुक्त होईल, अशी घोषणा सत्तापक्षाने केली होती. परंतु परिस्थितीचा विचार करता शहर टँकरमुक्त होण्याची शक्यता नाही. एवढेच नव्हे तर उन्हाळ्याच्या दिवसात २२० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. आता ही संख्या ३४० पर्यंत वाढली आहे. हुडकेश्वर व नरसाळा भागाचा शहरात समावेश करण्यात आल्याने टँकर वाढले आहेत. सोमवारी स्थायी समितीने टँकरच्या प्रत्येक फेरीच्या दरात ९ रुपयांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

ठळक मुद्देस्थायी समितीने फेरीमागे वाढविले ९ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिसेंबर २०१८ पर्यंत नागपूर शहर टँकरमुक्त होईल, अशी घोषणा सत्तापक्षाने केली होती. परंतु परिस्थितीचा विचार करता शहर टँकरमुक्त होण्याची शक्यता नाही. एवढेच नव्हे तर उन्हाळ्याच्या दिवसात २२० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. आता ही संख्या ३४० पर्यंत वाढली आहे. हुडकेश्वर व नरसाळा भागाचा शहरात समावेश करण्यात आल्याने टँकर वाढले आहेत. सोमवारी स्थायी समितीने टँकरच्या प्रत्येक फेरीच्या दरात ९ रुपयांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. नियमानुसार ही वाढ करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.अमृत योजना कार्यान्वित झाल्यानतंर शहरातील टँकर कमी होतील, अशी माहिती त्यांनी दिली. दोन हजार लिटर क्षमतेच्या टँकरला प्रतिफेरी ३२८ रुपये, ३ हजार लिटर क्षमतेच्या टँकरला ३५८ रुपये, ४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरला प्रतिफेरी ३८६ रुपये तर ६ हजार लिटर क्षमतेच्या टँकरला ४२४ रुपये दर दिला जाणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत अवजड वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यात आला. यात ५.६५ कोटींचे बॅक हो लोडल, टिप्पर, पोकलॅन, स्क्रीड स्टियर लोडर व डोजर अशा विविध प्रकारची वाहने खरेदी केली जाणार आहेत. यासाठी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या मे. जगताप अ‍ॅन्ड असोसिएट यांना ४.५१ लाखांची रक्कम दिली जाणार आहे.महापालिके चे अधिकारी डीपीआर तयार करीत नसल्याने सल्लागाराची नियुक्ती करावी लागते, अशी माहिती कुकरेजा यांनी दिली.

टॅग्स :WaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका