शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

तान्ह्या पोळ्याला यंदा २०९ वर्षे पूर्ण

By admin | Updated: September 13, 2015 02:45 IST

भारत हा कृषिप्रधान देश असून भारतात सर्वत्र पोळा हा बैलांचा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी लाकडी बैलांचा पोळा लहान मुलांसाठी आयोजित करण्यात येतो.

सर्वात मोठा लाकडी बैल : राजे रघुजी भोसले यांनी सुरू केली परंपरा नागपूर : भारत हा कृषिप्रधान देश असून भारतात सर्वत्र पोळा हा बैलांचा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी लाकडी बैलांचा पोळा लहान मुलांसाठी आयोजित करण्यात येतो. हा तान्हा पोळा विदर्भ वगळता कुठेही साजरा करण्यात येत नाही. १८०६ साली श्रीमंत राजे रघुजीराव भोसले (द्वितीय) यांनी लाकडी बैलांचा हा उत्सव सुरू केला. लहान मुलांना बैलांचे महत्त्व कळावे म्हणून ही परंपरा त्यांनी सुरू केली. या परंपरेला यंदा २०९ वर्षे पूर्ण झाले आहेत. राजे रघुजीराव भोसले यांनी लाकडी बैल तयार करुन मागविले आणि सर्व लहान मुलांना ते वितरित केले. या बैलांना जिवंत बैलांप्रमाणे सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून तला जिलेबी, फळे, चॉकलेट, बिस्कीट बांधण्यात आले. लाकडी बैलांची पूजा करुन पूजा संपल्यावर तोरण तोडून खाऊ खायचा आणि हनुमान खिडकी मार्गे हनुमानाचे दर्शन घेऊन मुलांना खाऊ द्यायचा. अशी ही प्रथा होती. तेव्हापासून विदर्भात ही प्रथा पाळण्यात येत आहे. हल्लीचे राजे मुधोजीराव भोसले यांनीही ही प्रथा आजतागायत कायम ठेवली आहे. राजे मुधोजीराव भोसले यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. मुधोजीराजांचे निवासस्थान सिनीयर भोसला पॅलेस, महाल येथे आजही हा बैल ठेवण्यात आला आहे. या बैलाची उंची आठ फूट तर लांबी सहा फूट आहे. बैलाच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे. ज्या पद्धतीने रघुजी महाराज बैलाची वाजतगाजत मिरवणूक काढायचे त्याच पद्धतीने आजही मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सिनियर भोसला पॅलेस येथून काढण्यात येणार आहे. काही मंडळात वाड्यातील बैल गेल्याशिवाय पोळा साजरा करण्यात येत नाही. (प्रतिनिधी)