शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापुष्प सोसायटीत तान्हा पोळा उत्साहात साजरा 

By नरेश डोंगरे | Updated: September 3, 2024 20:04 IST

खास लहान मुलांना मान देण्याची प्रथा म्हणून साजरा करण्यात येणारा ताना पोळा शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या उत्साहात साजरा झाला.

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : खास लहान मुलांना मान देण्याची प्रथा म्हणून साजरा करण्यात येणारा ताना पोळा शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या उत्साहात साजरा झाला.

शहरातील शताब्दी चौकात भरविण्यात आलेल्या तान्ह्यापोळ्यात चिमुकल्यांनी आपापल्या नंदीबैलांना घेऊन प्रचंड गर्दी केली होती. पोळ्यात सहभागी झालेल्या चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यांना घेऊन आलेले पालक तसेच बघे म्हणून आलेले नागरिक या चिमुकल्यांच्या बैलांच्या सजावटीची तसेच तब्बल तीन-चार फूट उंचीच्या बैलांची प्रशंसा करीत होते. 

स्टेजवर बर्फातून साकारलेले मोठे शिवलिंग नाग आणि नंदी या पोळ्याचे आणखी एक खास आकर्षण होते. श्रीरंग महापुष्प सोसायटीमध्ये असलेल्या दक्षिणेश्वर शिव मंदिराच्या प्रांगणात भरलेला तान्हा पोळाही अनेकांचे आकर्षण ठरला. वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा आणि केशभूषा करून आलेले बालगोपाल आणि त्यांचे चिमुकल्या नंदीपासून तो मोठमोठ्या काष्ठशिल्पाचा अप्रतिम नमुना असलेले बैल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. कुणी शेतकऱ्यांची, कुणी कृष्णाची, कुणी सोल्जरची, तर कोणी कोणाची वेशभूषा करून आकर्षक रित्या सजविण्यात आलेल्या आपल्या नंदीबैलाला घेऊन या तान्ह्यापोळ्यात सहभागी झाले होते. उत्कृष्ट सजावट तसेच वेशभूशेत अव्वल ठरलेल्या चिमुकल्या स्पर्धकांना सुधीर येरणे, रमेश केवटे, ध्रुवकाका पाटील, प्रमोद वाघ, प्रवीण मांढरे, संजय पवार, देवानंद शेंडे, सुरेश चाफले यांच्या हस्ते आकर्षक पुरस्कार देण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूर