शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तान्हा पोळ्यात उत्साहात रंगले चिमुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:37 IST

आकर्षक सजावट, भारतमाता, शेतकरी, महादेव, शिवाजी महाराज अशा वेशभूषा करून नटलेले बालगोपाल, आकर्षक डौलदार नंदीसोबत लावलेले सामाजिक संदेश, अशा उत्साहाच्या वातावरणात शहरात तान्हा पोळा साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देचिमुकल्यांच्या वेशभूषा आणि आकर्षक नंदी सजावट ठरले आकर्षणदेशाचे संरक्षण, पर्यावरण, शेतकऱ्यांचे दोहन यावर दिले सामाजिक संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डीजेच्या तालावर महादेवाची गाणी, आंब्याची पाने आणि फुग्यांचे तोरण, आपला नंदी सर्वात छान दिसावा म्हणून केलेली आकर्षक सजावट, भारतमाता, शेतकरी, महादेव, शिवाजी महाराज अशा वेशभूषा करून नटलेले बालगोपाल, आकर्षक डौलदार नंदीसोबत लावलेले सामाजिक संदेश, अशा उत्साहाच्या वातावरणात शहरात तान्हा पोळा साजरा करण्यात आला. 
ढोलताशांच्या गजरात खाऊची धम्माल, आयोजकांकडून करण्यात आलेली बक्षिसांची लयलूट, बोजाऱ्याच्या रूपात घराघरातून मिळणारे चॉकलेट तर कुठे पैसे मिळाल्यानंतर ओसंडून वाहणारा चेहऱ्यावरचा आनंद शहरातील गल्लोगल्लीत अनुभवायला आला. शहरात शनिवारी तीनशेहून अधिक ठिकाणी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 
नवीन सुभेदारमधील तान्हा पोळ्यात बच्चे कंपनीची धूमस्व. अमर शहीद विजय कापसे स्मृतिप्रीत्यर्थ नवीन सुभेदार येथील नागमंदिराजवळ आयोजित तान्हा पोळ्यात बच्चे कंपनीने धूम केली. मागील २५ वर्षांपासून नवीन सुभेदार ले-आऊटमध्ये तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विविध वेशभूषा केलेल्या ५ हजार बालकांनी आपले नंदीबैल घेऊन तान्हा पोळ्यात हजेरी लावली. बालकांनी केलेल्या आकर्षक वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यात शेतकरी, श्रीकृष्ण, राधा, विठ्ठल, शंकरजी, श्रीगणेश, तिरुपती बालाजी आदींची वेशभूषा बालकांनी केली होती. तर सामाजिक संदेश देणारे नंदी घेऊन बालक तान्हा पोळ्यात सहभागी झाले होते. यात सेव्ह ट्री, बेटी बचाओ, बेटी पढाओ, पर्यावरण रक्षण, स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष आभा चतुर्वेदी, माजी नगरसेवक दीपक कापसे, सक्करदºयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित सिद, हुडकेश्वरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, प्रकाश इटनकर, मधुसूदन मुडे, बबन यादव, डॉ. डी. बी. चौधरी, किशोर करांगळे, आदर्श शिक्षक वासुदेव कापसे, ए. बी. जिचकार आदी मान्यवर उपस्थित होते. आकर्षक वेशभूषा केलेल्या चार बालकांना सायकल आणि शिल्ड आणि सहा बालकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. पहिल्या चार नंदीला सायकल आणि शिल्ड तसेच सहा नंदीला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. मान्यवरांनी बैलाची पूजा करून विजेत्या नंदीला पुरस्काराचे वितरण केले. तान्हा पोळा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आकर्षक वेशभूषा करून बालकांनी वेधले लक्षअयोध्यानगर, कृष्णमंदिरासमोरील सुर्वे ले-आऊट येथे पुरुषोत्तम ऊर्फ बापू मते व्यायामशाळेच्या वतीने तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. तान्हा पोळ्यात हजारावर बालकांनी आकर्षक वेशभूषा करून हजेरी लावली. मागील २८ वर्षांपासून येथे पोळा भरविण्यात येतो. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, गिरीश पांडव, प्रमोद मानमोडे, माजी आमदार मोहन मते, विशाल मुत्तेमवार, नगरसेवक अभय गोटेकर, नगरसेविका रिता मुळे, स्नेहल बिहारे, विजय अडसड उपस्थित होते. तान्हा पोळ्यात बालकांनी शेतकरी, श्रीकृष्ण, राधा, राम, श्री गणेश, विठ्ठल, संतांची वेशभूषा करून हजेरी लावली. तर बालकांनी हातात पर्यावरण बचाओ, बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्वच्छता आदी संदेश देऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या तीन नंदीला रोख पुरस्कार तसेच लकी ड्रॉद्वारे चार सायकल भेट देण्यात आल्या. याशिवाय सजावटीसाठी पुरस्कार देण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बालकांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. तान्हा पोळ्याचे आयोजन महेश बांते, राजेश शेळके, गणेश धोटे, सचिन मते, नूपुर मते यांनी केले. तान्हा पोळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.श्री टेकडी रोड हनुमान मंदिरश्री टेकडी रोड हनुमान मंदिर समिती गवळीपुरा सीताबर्डी येथे तान्हा पोळा आयोजित करण्यात आला होता. जवळपास ८०० बालके पोळ्यात सहभागी झाली होती. समितीतर्फे नंदीबैलाची पूजा करण्यात आली. बालकांना खाऊ वाटण्यात आला. ढोलताशांचा गजर करण्यात आला. याप्रसंगी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, सुंदर नंदी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत विजयी ठरलेल्या बालकांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.बालजगतलक्ष्मीनगरातील बालजगतमध्ये तान्हा पोळा थाटात साजरा झाला. लहान बालके शेतकरी राजा बनले होते. बालिका नऊवारी नेसून दिमाखात मिरवत होत्या. प्रत्येकाने आपले नंदीबैल सजवून आणले होते. बालजगतच्या आयोजकांनी बैलांची पूजा करून प्रसाद वाटला. यावेळी जगदीश सुकळीकर, माधवी जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.राजाबाक्षाराजाबाक्षा नागरिक सेवा समिती व जय दुर्गा उत्सव मंडळ यांच्यावतीने तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीच्या ज्येष्ठ मंडळींनी शंकराची गाणी गायली. आलेल्या चिमुकल्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. नंदीची पूजा करून चॉकलेट दिले. यावेळी एका चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांंने यावर्षी पडलेल्या दुष्काळाचे चित्र उभे करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. उत्सवाच्या आयोजनासाठी सुनील काडगाये, विष्णू भुते, दिनकर वानखेडे, राजू कुंभलकर, मुकेश खराबे, पंचांग चकोले, अविनाश ईश्वरकर, दिलीप बांते, शंकर बजवे, अरविंद बांते व धनराज इश्वरकर आदींनी सहकार्य केले.चिंचभुवनचिंचभुवन येथे तान्हा पोळाचे आयोजन करण्यात आले. तान्हा पोळ्यात ५०० नंदी आले होते. पोळ्याचे आयोजन प्रणित मोहोड, पवन पन्नासे यांनी केले. बालक विविध प्रकारची वेशभूषा करून नंदीसह उत्साहात सहभागी झाले होते. विजेत्या नंदीला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमचे चिंचभुवनचे ज्येष्ठ नागरिक गजानन भोयर, राजू नागापूरकर, संजय घाटे, अभिमन्यू मोहोड, छत्रपती बोबडे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला अमित नाहाले, अनिकेत सातपुते, साहिल सातपुते, स्वप्निल बोबडे, रोशन व्हारडकर, आशिष बोबडे उपस्थित होते.प्रतापनगरप्रतापनगर चौक येथे भव्य तान्हा पोळा आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तान्हा पोळ्यात ३०० हून अधिक बालगोपाल सहभागी झाले होते. चिमुकल्यांनी आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदा जिचकार, गोपाल बोहरे, लीलाधर डाफ, तीर्थराज पन्नासे, अशोक भोयर, विनय राऊत, प्राजक्त चौधरी, विनोद पांडे, महेश उपदेव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राकेश पन्नासे आणि सहकाऱ्यांनी केले. विजेत्या नंदीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तान्हा पोळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर