शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळवाणी जंगलातील शिकारप्रकरण : तीन शिकारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 21:21 IST

वन विभागाच्या कोंढाळी (ता. काटोल) वनपरिक्षत्रांतर्गत मूर्ती बीटमधील तांदूळवाणी जंगलात वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी फिरत असलेल्या शिकाऱ्यास वन विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून गावठी (भरमार) बंदूक, १०९ छर्रे, सहा बंदुकीच्या गोळ्यांच्या कॅप व बिबट्याची कातडी जप्त केली. ही कारवाई सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

ठळक मुद्देबंदुकीसह बिबट्याची कातडी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कोंढाळी) : वन विभागाच्या कोंढाळी (ता. काटोल) वनपरिक्षत्रांतर्गत मूर्ती बीटमधील तांदूळवाणी जंगलात वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी फिरत असलेल्या शिकाऱ्यास वन विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून गावठी (भरमार) बंदूक, १०९ छर्रे, सहा बंदुकीच्या गोळ्यांच्या कॅप व बिबट्याची कातडी जप्त केली. ही कारवाई सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास करण्यात आली.मुकुंदा पुंजाराम नेहारे, अजय मधुकर सोमकुवर (३२) व संजय भीमराव भलावी (३२) तिघेही रा. तांदूळवाणी, ता. काटोल अशी अटक करण्यात आलेल्या शिकाऱ्यांची नावे आहेत. तांदूळवाणी गावाजवळ १ जानेवारी २०१९ रोजी दोन वर्षीय मृत बिबट आढळून आला होता. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध शिकारीचा गुन्हा नोंदवून जिल्हा वन संरक्षक शंभुनाथ शुक्ला व उपवन संरक्षक संदीप शिरसागर यांच्या मार्गदर्शनात कोंढाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी फरीद आझमी यांनी तपासाला सुरुवात केली.बिबट्याच्या शिकारीत मुकुंदा सहभागी असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली होती. मात्र, त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे अधिकाऱ्यांना मिळत नसल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणे शक्य होत नव्हते. त्यातच मुकुंदा हा सोमवारी (दि. १) रात्री जंगलात फिरत असल्याची माहिती फरीद आझमी यांना मिळाली. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी त्याचा जंगलात शोध घेतला. तो अहमदनगर उपवनाच्या मूर्ती बीटमध्ये आढळून येताच कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत कसून विचारपूर केली.त्याने १ जानेवारी रोजी बिबट्याची शिकार केल्याचे कबूल केले. शिवाय, त्याच्या साथिदारांची नावेही सांगितली. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. २) सकाळी अजय व संजय या दोघांनाही अटक केली. ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी फरीद आझमी, वनक्षेत्र अधिकारी सुनील मोहोड, वनरक्षक दिवाकर लोखंडे, अजय काठमोडे यांच्या पथकाने केली.चार दिवसांची वन कोठडीआरोपींची गुन्ह्याची कबुली देताच त्यांच्याकडून बिबट्याची कातडी, गावठी (भरमार) बंदूक, १०९ छर्रे, सहा बंदुकीच्या गोळ्यांच्या कॅप जप्त करण्यात आल्या. त्यांना मंगळवारी काटोल येथील प्रथम रेणी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तिघांनाही चार दिवसांची अर्थात शुक्रवारपर्यंत (दि. ५) वन कोठडी सुनावली. त्यांच्याकडून शिकारीच्या काही घटना उघड होण्याची शक्यत वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.‘थर्टी फर्स्ट पार्टी’ने केला घातनोव्हेंबर २०१८ मध्ये तांदूळवाणीच्या जंगलात दोन बिबट मृतावस्थेत आढहून आले होते. या तिन्ही आरोपींनी अन्य दोघांच्या मदतीने ‘त्या’ बिबट्यांची कातडी सोलून काढली होती. ती अजयच्या शेतात असलेल्या गोठ्यात लपवून ठेवली होती. ३१ डिसेंबर २०१८ च्या रात्री या तिघांनी शेतात ‘थर्टी फर्स्ट पार्टी’ केली. त्यावेळी गोठ्याचे दार चुकून उघडे राहिले आणि कुत्र्याने आत शिरकाव केला. त्या कुत्र्याने बिबट्याची कातडी बाहेर आणली. अंधारात ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आली. या तिघांनी ‘त्या’ बिबट्यांची शिकार केली असावी, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगलArrestअटक