शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ परिसरातील उंच-उंच इमारती, लँडिंग अन् टेक ऑफ, धोका होत आहे दुर्लक्षित

By नरेश डोंगरे | Updated: June 12, 2025 22:43 IST

गुजरातमधील दुर्घटनेमुळे पुन्हा चर्चा

- नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गुजरातमधील विमानाच्या भीषण दुर्घटनेमुळे नागपुरातील विमानतळानजीकच्या उंच-उंच इमारती पुन्हा एकदा 'फोकसमध्ये आल्या आहेत. या इमारतीच्या आजूबाजूने रोज मोठ्या प्रमाणात येथील विमानतळावर विमाने उतरतात आणि झेपावतात.

देशात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नागपूरचे नाव घेतले जाते. शहर चारही दिशांनी झपाट्याने वाढत असले तरी शहराचा दक्षिणेकडील भाग अधिकच वेगाने विकसित होत आहे. मोठमोठ्या शिक्षण संस्था, आरोग्य संस्था या भागात आल्या आहेत. रोज नवनव्या गृह प्रकल्पांची पायाभरणी या भागात होत असून, आज घडीला अनेक गगनचुंबी इमारती विमानतळाच्या आजूबाजूला असलेल्या न्यू मनीषनगर, चिंचभवन, सोनेगाव, प्रतापनगर भागात निर्माण झाल्या आहेत. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमानांची तास ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे, धावपट्टीवर उतरणारी विमाने चिंचभुवन उड्डाणपुलाकडून येतात आणि जाणारी विमाने सोनेगाव, प्रतापनगर दिशेने झेपावतात. या दोन्ही दिशांना अनेक मोठ्या इमारती उभ्या झाल्या असून, अनेक बहुमजली इमारतींचे निर्माण कार्य सुरू आहे. या इमारतींमुळे विमान उतरताना किंवा झेपावताना धोका होऊ शकतो, अशी भीती वारंवार व्यक्त केली जाते.

हाइट इन्स्ट्रक्शन्स, तरीसुद्धा..

या पार्श्वभूमीवर, काही वर्षांपूर्वी त्या भागातील नवनिर्मित इमारतींना विशिष्ट मजल्यापेक्षा जास्त उंचीच्या बांधकामाची परवानगी देण्यात येऊ नये, अशी सूचनाही (हाइट इन्स्ट्रक्शन्स) बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील अनेक बहुमजली इमारती या भागात उभ्या झाल्या असून, अनेक इमारतींचे काम सुरू आहे. मुंबईच्या एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांनीदेखील अशाच प्रकारे न्यू मनीषनगरमध्ये बहुमजली इमारत उभी केली होती. या बांधकामाला आक्षेप घेण्यात आला होता. नंतर मात्र बरीच चर्चा, धावपळ झाली आणि नंतर प्रकरण निस्तरले गेले.

परवानगी घेऊनच बांधकामउंच इमारतीमुळे विमान दुर्घटनेचा धोका होण्याची भीती व्यक्त केली असल्याने क्रेडाईचे अध्यक्ष गाैरव अग्रवाल यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, विशिष्ट उंचीच्या नंतर बांधकाम करायचे असेल तर अशा इमारतीच्या बांधकामासाठी एअरपोर्ट अॅथॉरिटीची परवानगी घ्यावी लागते. फनल (सर्कल)च्या आतमध्ये प्रतिबंध असतो. मात्र, सर्कलच्या आतमध्ये नसेल तर अडचण नसते. त्यामुळे सर्व भागात परवानगी घेऊनच बांधकाम केले जाते, असे अग्रवाल यांनी सांगितले. 

टॅग्स :nagpurनागपूरAirportविमानतळ