शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला व्हिडीओ कॉलद्वारे विचारली घटस्फोटाची सहमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:10 IST

न्यायालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग हळूहळू वाढत आहे. १४ जानेवारी रोजी कुटुंब न्यायालयाच्या न्यायाधीश एस.ए. चव्हाण यांनी व्हिडीओ कॉलद्वारे अमेरिकेत राहणाऱ्या पत्नीशी संपर्क साधून तिची पतीला घटस्फोट देण्याची तयारी असल्याची खात्री करून घेतली व त्यानंतर आपसी सहमतीने घटस्फोट झाल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाची विधी वर्तुळात प्रशंसा झाली.

ठळक मुद्देकुटुंब न्यायालय : उच्च शिक्षित दाम्पत्य झाले विभक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग हळूहळू वाढत आहे. १४ जानेवारी रोजी कुटुंब न्यायालयाच्या न्यायाधीश एस.ए. चव्हाण यांनी व्हिडीओ कॉलद्वारे अमेरिकेत राहणाऱ्या पत्नीशी संपर्क साधून तिची पतीला घटस्फोट देण्याची तयारी असल्याची खात्री करून घेतली व त्यानंतर आपसी सहमतीने घटस्फोट झाल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाची विधी वर्तुळात प्रशंसा झाली.प्रकरणातील दाम्पत्य उच्च शिक्षित असून दोघेही अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत. पती मूळचा नागपूरचा तर, पत्नी हैदराबादची आहे. २०१३ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यानंतर त्यांनी काही दिवस गुण्यागोविंदाने संसार केला. दरम्यान, त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. मतभेदाचे रूपांतर भांडणात झाले. त्यामुळे त्यांना एका छताखाली एकत्र राहणे कठीण झाले. परिणामी, पतीने कुटुंब न्यायालयात घटस्फोट याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणात मध्यस्थी प्रक्रियेचा अवलंब केला. त्यामध्ये दाम्पत्याने आपसी सहमतीने वाद संपवून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नागपुरात येणे अशक्य झाल्यामुळे पत्नीने तिच्या सख्खया भावाला निर्णयाचे सर्व अधिकार दिले होते. त्यानुसार, पत्नीच्या भावाने व पतीने न्यायालयात वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दाखल करून आपसी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर न्यायालयाने पत्नी खरेच घटस्फोटासाठी तयार असल्याची व्हिडीओ कॉलद्वारे खात्री करून घेतली. पतीतर्फे अ‍ॅड. समीर सोनवणे तर, पत्नीतर्फे अ‍ॅड. स्मिता सिंगलकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Divorceघटस्फोटCourtन्यायालय