शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांची फेरचाचणी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 18:34 IST

कामठी रोडवरील नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबमधून नियमित आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणी दिलेल्या विद्यार्थ्यांची १५ दिवसांमध्ये फेरचाचणी घेण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला दिला. या लॅबमध्ये नियमित चाचणीदरम्यान ‘मास चिटिंग’ झाल्याचा आरोप होता.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : आयुर्वेद संस्थेला १५ दिवसांचा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी रोडवरील नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबमधून नियमित आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणी दिलेल्या विद्यार्थ्यांची १५ दिवसांमध्ये फेरचाचणी घेण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला दिला. या लॅबमध्ये नियमित चाचणीदरम्यान ‘मास चिटिंग’ झाल्याचा आरोप होता.यासंदर्भात किशोर सोनवाणेसह एकूण १८ विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर आयुर्वेद संस्था व नेक्सटेक टेक्नॉलॉजी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून चाचणीत ‘मास चिटिंग’ झाली नसल्याचा दावा केला, पण त्यांच्या स्पष्टीकरणाने न्यायालयाचे समाधान झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने लॅबमधील सीसीटीव्ही फुटेज मागवले होते. परंतु, न्यायालयात पूर्ण सीसीटीव्ही फुटेज सादर करण्यात आले नाही. सीसीटीव्ही फुटेज तुकड्यांमध्ये होते. तांत्रिक कारणामुळे सीसीटीव्ही फुटेज करप्ट झाल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. आयुर्वेद संस्था व नेक्सटेकला त्याचाही फायदा झाला नाही. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये विद्यार्थी एकमेकांसोबत चर्चा करीत असल्याचे दिसत होते. न्यायालयाने स्वत: सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर न्यायालयाने एकंदरित परिस्थिती लक्षात घेता या विद्यार्थ्यांची फेरचाचणी घेणार का अशी विचारणा आयुर्वेद संस्थेला केली होती. संस्थेने संबंधित समितीशी चर्चा केल्यानंतर फेरचाचणी घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे न्यायालयाने हा आदेश देऊन याचिका निकाली काढली.नियमित प्रवेश चाचणी गेल्या २४ जून रोजी झाली. परीक्षा केंद्रांमध्ये नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबचा समावेश होता. या केंद्रामध्ये परीक्षा अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने कर्तव्य बजावले नाही. विद्यार्थी एकमेकांशी चर्चा करून उत्तरे सोडवत असताना त्यांना कुणीच टोकत नव्हते. यासंदर्भात लगेच परीक्षा अधिकाºयांकडे तक्रार केली. त्यानंतर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक, जरीपटका पोलीस व शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रारी केल्या. परंतु, कुणीच ऐकले नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनुप ढोरे यांनी बाजू मांडली.निकाल जाहीर करण्याची मुभानेक्सटेक लॅबमधून चाचणी देणारे विद्यार्थी वगळता अन्य विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याची मुभा न्यायालयाने दिली. परंतु, नेक्सटेकमधील विद्यार्थ्यांच्या फेरचाचणीचा निकाल जाहीर होतपर्यंत आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास मनाई केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे