शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

नागपूर जिं क ले ! सर्वत्र शांतता एकोप्याचे दर्शन

By admin | Updated: July 31, 2015 02:34 IST

१९९३ च्या मुंबई येथील विध्वंसक बॉम्बस्फोट मालिकांनी मृत्यू थरारला होता. २५७ जीवांचा तडफडून मृत्यू झाला होता.

राहुल अवसरे नागपूर१९९३ च्या मुंबई येथील विध्वंसक बॉम्बस्फोट मालिकांनी मृत्यू थरारला होता. २५७ जीवांचा तडफडून मृत्यू झाला होता. जखमी होऊन शेकडो माणसांच्या नशिबी कायमचे अपंगत्व आले होते. या क्रूर घटनेचा सूत्रधार मानवतेचा संहारक याकूब मेमनला तब्बल २२ वर्षांनंतर गुरुवारी भल्या सकाळी देशाच्या ‘झिरो माईल्स’ शहरात नागपूर मध्यवर्ती कारागृहात फासावर देण्यात आले. जे मारल्या गेले त्यात साऱ्याच समुदायाचे लोक होते. निष्पाप, निष्कलंक होते. त्यामुळे याकूब मानवतेचा अपराधी होता. न्यायसंस्थेनेच त्याला अपराधी ठरवले होते. नागपूर मिश्र समुदायांचे शहर आहे. शांती आणि सौख्य येथे नांदत असते. जातीय वैमनस्याला येथे थारा नाहीच. कधी काळी अशा वैमनस्याच्या तुरळक घटना घडल्या आहेत. पण त्याला फारशी हवा मिळाली नाही. नामांतर, बाबरी, रमाबाई आंबेडकरनगर, खैरलांजीवरून हिंसक घटना घडल्या पण अधिक काळ तगल्या नाहीत. येथील नागरिकांनी १९६५ चे धगधगते नागपूर पाहिले आहे. दूरदर्शनवर अलिकडे अन्य राज्यांमध्ये घडलेल्या दंगलीही पाहिल्या आहेत. त्यामुळे नको हा हिंसाचार म्हणत साध्या पुतळा विटंबनेची घटना घडूनही या शहराने शांती स्वीकारली आहे. तरीही याकूबच्या फाशीनंतर येथे काही तरी मोठे घडेल असे वाटले होते. तीन-चार दिवसांपूर्वीपासून येथील जनजीवन विलक्षण तणावात वावरत असल्याचा अभास निर्माण झाला होता. गुप्तचर यंत्रणांनी तशा शंकाही व्यक्त केल्या होत्या. शांतता बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका, अशा सूचना पोलीस मोबाईल आणि टी.व्ही.च्या माध्यमातून प्रसिद्ध करीत होते. मित्रमंडळ व्हॉटस्अपवरून एकदुसऱ्यांना सूचना देत होते. जागोजागी नाकेबंदी, झडत्या सुरू करण्यात आल्या होत्या. क्विक रिस्पॉन्स कमांडो पथके सतत फिरत होती. त्यामुळे सामान्य जनजीवनावरचा ताण आणखी वाढत होता. प्रत्यक्षात जनमानसावरील भयाचे वातावरण नाहीसे करण्यासाठी पोलिसांची ही साथ होती. अभूतपूर्व बंदोबस्त होता. शहरभर फिरणारे कमांडोज आणि नाकेबंदी करणारे पोलीस जवान शांततेसाठीच झटत होते. फाशीची घटका आली. काही वेळाने फाशीही देण्यात आली. पण नागपूरकरांनी संयम दाखवला. संयम दाखवल्यानेच भयाचे वातावरणही संपुष्टात आले. कोणतीही गैर प्रतिक्रया उमटली नाही. मुलांनी आपापल्या शाळांची वाट धरली. दुकानदारांनी दुकाने सुरू केली. बाजारांमधील गर्दी आणि बसगाड्या कालच्याच गतीने धावल्या, प्रार्थनास्थळांवरील वातावरण नेहमीप्रमाणे होते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या ईदच्या वेळी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना दिलेली आलिंगने, तेवढीच मजबूत व घट्ट होती. आम्ही समाजविघातक शक्तींच्या कुठल्याही अपप्रचाराला, चिथावणीखोर वक्तव्यांना बळी पडत नाही, भीक घालत नाही. सर्वधर्मीयांमधील एकोप्याचे नाते अबाधित आहे, हे नागपूरकरांनी दाखवून दिले, म्हणूनच नागपूर आज जिंकले.