शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पैसे घेतात, पण कचरा उचलत नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 12:16 IST

शहरातील हॉस्पिटलमधून निघणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जाते. परंतु कचरा गोळा करण्यासाठी म्युनिसिपल सॉलिड वेस्ट(एमएसडब्ल्यू)च्या गाड्या नियमित येत नाहीत.

ठळक मुद्देहॉस्पिटलच्या कचऱ्याची समस्यातक्रार करूनही सुनावणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील हॉस्पिटलमधून निघणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जाते. परंतु कचरा गोळा करण्यासाठी म्युनिसिपल सॉलिड वेस्ट(एमएसडब्ल्यू)च्या गाड्या नियमित येत नाहीत. वास्तविक महापालिका हॉस्पिटलमधून निघणारा कचरा उचलण्यासाठी शुल्क वसूल करते. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे(दवाखाने) शहरातील डॉक्टरांनी अनेकदा तक्रारी केल्या, परंतु याची दखल घेतली जात नाही.‘लोकमत’ने धंतोली व हनुमाननगर झोनच्या कार्यक्षेत्रातील हॉस्पिटलच्या कचऱ्यामुळे होणारी घाण व महापालिके चे दुर्लक्ष यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतरही महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही.दुसरीकडे इंडियन मेडिकल असोसिएशनशी संबंधित डॉक्टरांनी मेडिकल वेस्टसंदर्भात केलेल्या तक्रारींची माहिती दिली.कनक रिसोर्सेस कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा त्यांनी आरोप केला. महाराष्ट्राच्या आयएमएच्या कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदावर असलेल्या एका डॉक्टरांनी सांगितले की, पाच बेडच्या रुग्णालयासाठी सुपर्ब हायजेनिक दर तीन महिन्यात २२०० रुपये घेतात, मात्र त्यांच्या गाड्या नियमित येतात. तर एमएसडब्ल्यू वर्षाला तीन हजार रुपये जमा करूनही कचरा उचलण्यासाठी गाड्या पाठवत नाही.यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे यासंदर्भात तक्रारी केल्या, परंतु ते आपली जबाबदारी झटकतात. हे काम स्वच्छता विभागाचे असल्याचे सांगतात. यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.तक्रारी आल्या तर त्यांचा निपटारा केला जात असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागा(स्वच्छता)च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. शुल्क आकारून सेवा देण्याचा प्रश्नच नाही. जर कुणाची तक्रार असेल तर त्यांनी ती योग्य विभागाकडे करावी. अशी अनेक प्रकरणे निकाली काढलेली असल्याचे त्यांनी सांगितले.दररोज निघतो तीन टन जैव कचराशहरातील हॉस्पिटलमधून दररोज अडीच ते तीन टन बायोमेडिकल वेस्ट (जैव कचरा) निघतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सुपर्ब हायजेनिक यांच्याकडे सोपविली आहे. भांडेवाडी येथे या कंपनीचा प्लांट आहे. येथे जैव कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल