शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसात सोक्षमोक्ष लावा : पाराशर यांचे पोलिसांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:59 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागातील एका माजी विद्यार्थिनीने माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर आणि विभागप्रमुख डॉ. राजश्री वैष्णव यांच्यावर केलेल्या विनयभंगाच्या आरोपाचा शोध लावण्यात अद्याप अंबाझरी पोलिसांना यश आले नसले तरी या प्रकरणाचा तीन दिवसात सोक्षमोक्ष लावा अन्यथा याप्रकरणी आपण न्यायालयात दाद मागू, असे पत्र सोमवारी डॉ. पाराशर यांनी अंबाझरी पोलिसांना सादर केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे अन्यथा न्यायालयात जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागातील एका माजी विद्यार्थिनीने माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर आणि विभागप्रमुख डॉ. राजश्री वैष्णव यांच्यावर केलेल्या विनयभंगाच्या आरोपाचा शोध लावण्यात अद्याप अंबाझरी पोलिसांना यश आले नसले तरी या प्रकरणाचा तीन दिवसात सोक्षमोक्ष लावा अन्यथा याप्रकरणी आपण न्यायालयात दाद मागू, असे पत्र सोमवारी डॉ. पाराशर यांनी अंबाझरी पोलिसांना सादर केल्याची माहिती आहे.तक्रारकर्त्या विद्यार्थिनीने तिच्या पोलीस तक्रारीत केलेल्या सर्व आरोपांचे खंडन करीत आपल्याला बदनाम करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचे पाराशर यांनी म्हटले आहे. आपण २ जुलै २०१६ पासून विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या विभागप्रमुखाच्या कक्षात बसून राहायचो, असे तक्रारीत म्हटले आहे. मुळात ३१ जुलै २०१३ रोजी विद्यापीठातून निवृत्त झाल्यावर भारत सरकारने आपली इंडियन मॅरिटाइम युनिव्हर्सिटी येथे जून २०१५ मध्ये प्र-कुलगुरूपदी नियुक्ती केली होती. जुलै २०१६ पर्यंत या विद्यापीठाच्या मुंबई येथील कार्यालयात माझे मुख्यालय होते. तिथे मी पूर्णवेळ कार्यरत होतो. तशी माहिती केंद्र सरकारच्या दस्तऐवजात उपलब्ध आहे. अशात तक्रारकर्त्याच्या आरोपानुसार मी विभागप्रमुखाच्या कक्षात बसायचो, यात काहीएक तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच काय तर २० मार्च २०१७ रोजी तक्रारकर्त्याने विनयभंगाची घटना झाल्याचे म्हटले आहे. मुळात १६ ते २२ मार्च २०१७ या काळात मी नागपुरात नव्हतो. यासंदर्भात धारवाड विद्यापीठाचे उपस्थिती पत्र आणि विमान प्रवासाच्या तिकिटाचे पुरावेही पाराशर यांनी पोलिसांकडे जमा करीत या प्रकरणात आपले नाव वगळण्यात यावे अन्यथा आपण झालेल्या तक्रारीविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यास मोकळे राहू, असेही पाराशर यांनी या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठMolestationविनयभंग