शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मानव-पशू संघर्ष टाळण्यासाठी ठोस उपाय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 08:00 IST

Nagpur news चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव-पशू संघर्ष टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, याकरिता रेड लिंक्स कॉन्फेडेरेशन कंपनीच्या संचालक संगीता डोगरा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव-पशू संघर्ष टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, याकरिता रेड लिंक्स कॉन्फेडेरेशन कंपनीच्या संचालक संगीता डोगरा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव-पशू संघर्षात वाढ झाली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे आतापर्यंत अनेक व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत. सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक भरपाई वितरित केली आहे. परंतु, पीडितांना भरपाई देणे व वन्यप्राण्यांना पिंजऱ्यात कैंद करणे, हा या समस्येवर उपाय नाही. वन परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित जीवन प्रदान करणे आणि वने व वन्यप्राण्यांचे संवर्धन करणे ही सरकारची महत्त्वाची जबाबदारी आहे. सरकार ही जबाबदारी प्रभावी पद्धतीने पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. मानव-पशू संघर्ष होऊ नये याकरिता सर्वोच्च न्यायालयाने विविध निर्देश दिले आहेत. याविषयी कायदे व नियमही आहेत. असे असताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे माणसे मरत आहेत. संबंधित व्यक्ती केवळ सरकारच्या निष्काळजीपणाचे बळी ठरले, असे म्हणता येणार नाही. हा खून असून त्याला सरकार जबाबदार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वारंवार अशा दुर्दैवी घटना घडत असताना सरकार गप्प आहे. त्यामागचा हेतू स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यामुळे वन परिसरात झालेल्या मानवी मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात यावे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

नियमबाह्य पद्धतीने ठरवतात नरभक्षक

वनाधिकारी वन्यप्राण्यांना नियमबाह्य पद्धतीने नरभक्षक ठरवतात. आतापर्यंत अशा अनेक वाघ व बिबट्यांना पिंजऱ्यात कैद करण्यात आले आहे. परंतु, त्यामुळे मानव-पशू संघर्ष थांबलेला नाही. करिता, सरकारने वन परिसरातील मानवी मृत्यूसंदर्भात वैज्ञानिक पुरावे सादर करावेत आणि कैदेतील वाघांना वनात मुक्त करावे, असेही याचिकाकर्तीचे म्हणणे आहे.

त्रुटी दूर करण्याचे निर्देश

या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाला याचिकेत काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे त्रुटी दूर करण्यासाठी याचिकाकर्तीला सहा आठवड्याचा वेळ देऊन सुनावणी तहकूब करण्यात आली. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी ॲड. झिशान हक यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव