शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

दारू घ्या, चकना घ्या, येथेच प्या अन् नंतर गुन्हे करा, कळमन्यात दारूड्यांना, गुन्हेगारांना खास सेवा

By नरेश डोंगरे | Updated: November 9, 2023 20:21 IST

दारू विक्रेत्यांचा निर्ढावलेपणा अन् पोलिसांची मेहरनजर

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : उपराजधानीतील सर्वात गर्दीचा आणि व्यापार-व्यवसायांच्या दृष्टीने सर्वात मोठा परिसर मानला जाणारा जाणाऱ्या कळमना परिसरात काही दारू विक्रेत्यांकडून दारूडे, गुन्हेगार, समाजकंटकांना खास सेवा दिली जात आहे. समाजमाध्यमावर आलेल्या व्हिडीओतून हा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. दारू विक्रेत्यांचा निर्ढावलेपणा अन् पोलिसांची मेहरनजर यातून दिसून येत आहे.

उत्तररात्रीपासून पहाटेपर्यंतचे काही तास सोडले तर उर्वरित दिवस रात्रीचे सर्व तास हा परिसर सुरू राहतो. विविध प्रांतातील, शहर आणि गावांतील धान्य, फळ आणि भाजीपाला उत्पादकांची आणि वाहनचालकांची तसेच कामगारांची कळमना मार्केटमध्ये रात्रं-दिवस वर्दळ असते. येथे माल दिल्यानंतर, काम आटोपल्यानंतर ते जागा मिळेल त्या ठिकाणी आराम करतात. तर, शहरातील भाजीपाला विकणारे पहाटे ४ वाजतापासून या ठिकाणी गर्दी करतात. अर्थात सर्वच जण पैसे घेऊन येथे पोहचतात किंवा येथून आपल्या मालाचे पैसे घेऊन परत निघतात. दिवस-रात्र येथे पैशाचे लेन-देण होत असल्याने कळमना मार्केट आणि आजुबाजुच्या १ किलोमिटरच्या परिसरात सावज शोधणारे गुन्हेगारही दिवसरात्र संधीच्या शोधात फिरत असतात. दारूचे गुत्ते या समाजकंटकांचे आश्रयस्थान असते. हे माहित असूनही जास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्याकडे यावे म्हणून कळमन्यातील काही दारू विक्रेत्यांनी दारूड्यांसाठी वेगवेगळ्या 'सेवा'ची व्यवस्था केली आहे. त्यामुळे त्या दुकानातून दारूडे दारूची बाटली घेतात. बाजुलाच उपलब्ध अंडी, चकणा, ग्लास आणि पाण्याची बाटली घेतात आणि दुकानाजवळच बसतात. तेथून तर्राट झाल्यानंतर सैराट सुटतात. बाजुने जाणाऱ्या - येणाऱ्यांशी भांडण करून त्याला लुटण्याचा प्रयत्न करतात. मारहाण करून दुसरेही मोठे गुन्हे करतात.

नेहमीचा आहे त्रास

विशेष म्हणजे, दारूड्यांना, गुन्हेगारांना 'खुली सुट आणि प्रोत्साहन' देणाऱ्या निर्ढावलेल्या दारू व्यावसायिकांना पोलिसांकडून विशेष सुट मिळाल्याचे जाणवते. त्यामुळे कळमन्यात हाणामारी, लुटमारीच्या घटना नेहमीच घडतात. छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांसाठी हा नेहमीचाच त्रास आहे.

व्हिडीओ व्हायरल, कोण घेणार दखल ?

दारू विक्रेत्याकडून समाजकंटकांना मिळणाऱ्या सेवा आणि या अवैध प्रकारामुळे नागिरकांना होणारा प्रचंड त्रास पोलिसांना कसा दिसत नाही, असा प्रश्न आहे. एका त्रस्त नागरिकाने या गंभीर प्रकाराचे फोटो आणि व्हिडीओ काढले. लोकमतच्या हाती हे फोटो आणि व्हिडीओ लागले असून, यातील दारू विक्रेत्यांची सेवा अन् त्याकडे पोलिसांचे कसे दुर्लक्ष होत आहे, ते स्पष्ट दिसून येते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी