शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन निधी मिळवून देण्याची कारवाई तातडीने करा

By admin | Updated: February 6, 2016 03:13 IST

नागपूर जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प कोच्छी बॅरेजला २०० कोटी तसेच पेंच प्रकल्पाच्या कामाकरिता ३०० कोटी त्वरित मिळवून देण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात यावी,...

पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश : विकास कामांचा घेतला आढावानागपूर : नागपूर जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प कोच्छी बॅरेजला २०० कोटी तसेच पेंच प्रकल्पाच्या कामाकरिता ३०० कोटी त्वरित मिळवून देण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. तसेच सत्रापूर प्रकल्पाकरिता ४२ कोटी मंजूर करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. याशिवाय सिंचन विभागात लोकल सेक्टर निर्माण झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या कामांचे भौगोलिकदृष्ट्या पूर्ण म्हणजे चालू कामे तसेच प्रस्तावित कामांच्या चित्रफिती तयार करण्याबाबत पालकमंत्र्यांनी यावेळी निर्देश दिले.विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील जिल्हा सहनिबंधक सहकार, नगर प्रशासन, सिंचन तसेच विविध विभागांच्या विकास कामांची आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार सुनील केदार, आमदार सुधीर पारवे, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, उपायुक्त (सामान्य प्रशासन) अप्पासाहेब धुळाज, उपजिल्हाधिकारी आशा पठाण, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, विदर्भ सिंचन महामंडळ, नागपूर सुधार प्रन्यास, विभागीय आयुक्त कार्यालयातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, मोठे, मध्यम तसेच लघु प्रकल्पांना निधी मिळवून देणे तसेच मामा तलावांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. पाण्याचे सुयोग्य नियोजन करून उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार नाही याबाबत योग्य कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघात एलईडी पथदिवे लावण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. भूमिगत पथदिवे केबल्ससाठी १८ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे. याबाबत सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेतला. पुढील कामांचे नियोजन करुन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. यावेळी नगर परिषद, नगर पंचायतीच्या विकास आराखड्याबाबत आढावा घेण्यात आला, त्याचबरोबर नगर परिषदांच्या विकास योजनेबाबत प्रगती अहवाल मागविण्यात आला. विकास योजनेत सूचना, तक्रारींचे निरसन करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.(प्रतिनिधी)जागा मिळाल्यास बकरा मार्केट स्थलांतरितनागपूर सुधार प्रन्यासने जागा उपलब्ध करून दिल्यास मोमिनपुरा येथील बकरा मार्केट हे कळमना मार्केट येथे स्थलांतरित करण्यात येईल. यासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकाऱ्यांसोबत येत्या १२ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. यावेळी बकरा मार्केटच्या स्थानांतरणाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.नगर परिषदेतील रिक्त जागा भरा आकृतीबंधानुसार नगर परिषदांच्या रिक्त जागा ३१ मार्च २०१६ पर्यंत भरण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. नगर परिषदेकडे असलेला निधी खर्च करण्याबाबत आणि नगरपालिकेच्या विकास आराखड्याची निर्मिती, त्याचप्रमाणे सर्व योजनानिहाय प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांची पुस्तिका तयार करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.