शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोषयुक्त कार विक्री प्रकरणात ताजश्री कार्सचे अपील खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 20:49 IST

दोषयुक्त कार विक्री प्रकरणातील आदेशांविरुद्ध होंडा कारचे डीलर एम्परर होंडा मे. ताजश्री कार्सचे संचालक अविनाश भुते यांनी दाखल केलेले अपील राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केले. आयोगाचे पीठासीन सदस्य ए. झेड. ख्वाजा व सदस्य ए. के. झाडे यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्दे ग्राहक आयोगाचा निर्णय : वादग्रस्त आदेशांना आव्हान देण्यास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोषयुक्त कार विक्री प्रकरणातील आदेशांविरुद्ध होंडा कारचे डीलर एम्परर होंडा मे. ताजश्री कार्सचे संचालक अविनाश भुते यांनी दाखल केलेले अपील राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केले. आयोगाचे पीठासीन सदस्य ए. झेड. ख्वाजा व सदस्य ए. के. झाडे यांनी हा निर्णय दिला.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने २१ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या आदेशांना या अपीलद्वारे आव्हान देण्यात आले होते. परंतु, आव्हान देण्यास विलंब केल्यामुळे अपील फेटाळण्यात आले. निर्णयातील माहितीनुसार, मूळ तक्रारकर्ते राम करहू यांनी ताजश्री कार्सकडून १२ लाख ३२ हजार ७३८ रुपयांत कार खरेदी केली होती. त्यांना ३१ मार्च २०१७ रोजी कार हस्तांतरित करण्यात आली. त्या कारमध्ये करहू यांना सुरुवातीपासूनच विविध समस्या जाणवायला लागल्या. त्यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, पण त्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता करहू यांना नवीन कार देण्यात यावी किंवा त्यांचे १२ लाख ३२ हजार ७३८ रुपये १० टक्के व्याजासह परत करण्यात यावे, असे आदेश ताजश्री कार्सला दिले. तसेच, करहू यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ३० हजार व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. या आदेशांविरुद्ध ताजश्री कार्सने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी सदर अपील दाखल केले होते. करहू यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीकांत सावजी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचnagpurनागपूर