शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

टागोरांनी भारतीय साहित्याला नवे आयाम दिले : सुपंथ भट्टाचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:44 IST

रवींद्रनाथ टागोरांचे मानवतेवर प्रेम होते. देशप्रेम या भावनेपेक्षा मानवतेची भावनाच सर्वात मोठी असल्याबद्दल म. गांधी यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती. मराठीतील महेश एलकुंचवार, कवी ग्रेस आदी अनेक लेखक त्यांच्यावर प्रेम करतात. येथे कधीच भाषेची अडचण आली नाही. भाषेच्या पलिकडे भावनांची भाषा बोलणारे कलावंत होते. त्यांनी बंगाली साहित्यालाच नव्हे तर एकूणच भारतीय साहित्याला नवे आयाम दिले, असे मत सुपंथ भट्टाचार्य यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे वि.सा. संघातर्फे टागोर जयंतीवर विशेष कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रवींद्रनाथ टागोरांचे मानवतेवर प्रेम होते. देशप्रेम या भावनेपेक्षा मानवतेची भावनाच सर्वात मोठी असल्याबद्दल म. गांधी यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती. मराठीतील महेश एलकुंचवार, कवी ग्रेस आदी अनेक लेखक त्यांच्यावर प्रेम करतात. येथे कधीच भाषेची अडचण आली नाही. भाषेच्या पलिकडे भावनांची भाषा बोलणारे कलावंत होते. त्यांनी बंगाली साहित्यालाच नव्हे तर एकूणच भारतीय साहित्याला नवे आयाम दिले, असे मत सुपंथ भट्टाचार्य यांनी व्यक्त केले.विदर्भ साहित्य संघातर्फेरवींद्रनाथ टागोर यांच्या १५८ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्यावर भाष्य करणाऱ्या ‘मोने रेखो’या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी वि. सा. संघाच्या ग्रंथालयात करण्यात आले. यावेळी मृणालिनी केळकर, सुपंथ भट्टाचार्य, मंदिरा गांगुली आणि माधवी भट यांनी भाष्य केले. भट्टाचार्य म्हणाले, बंगालमध्ये लघुकथा नव्हती पण रवींद्रनाथांनी ती आणली. रवींद्रनाथ टागोर बहुआयामी प्रतिभेचे धनी होते. कविता, संगीत, समालोचन, लेखन, कथा, चित्रकला अशा बहुविध कलाप्रांतात यशस्वी मुशाफिरी करणारे होते. त्यामुळेच माणसांमध्ये परस्परांमध्ये प्रेम आहे तोपर्यंत टागोर जिवंत राहतील, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.मंदिरा गांगुली यांनी निसर्ग आणि रवींद्रनाथ विषयावर प्रकाश टाकला. रवींद्रनाथ १२ वर्षे लोकांपासून दूर एका बंगल्यात राहिले. त्या बंगल्याच्या खिडकीतून त्यांना नेहमी निसर्ग खुणावायचा. आपण चार वर्ण मानतो ते वर्ण त्यांनी निसर्गाशी जोडले. निसर्गाचा मानवी जीवनाशी असणारा संबंध त्यांनी अनेक वेळा अधोरेखित केला आहे. झाडे वाढावीत म्हणून त्यांनी निसर्गाच्या पंचतत्त्वांना एका कवितेतून केलेले आवाहन त्यांची वैश्विकता सांगणारी आहे. मानवी जीवनाला उपकारक असणारा निसर्ग, त्याचे लाभ आणि निसर्गाच्या वृत्तींचे दर्शन त्यांनी साहित्यातून घडविले. मृणालिनी केळकर यांनी ‘राजपथ’ या त्यांच्या लघुकथेचा अनुवाद रसाळपणे सादर करुन रस्त्यांची मनोभूमिका वाचिक अभिनयातून सादर केली. माधवी भट यांनी रवींद्रनाथांच्या कथेतील पाच नायिकांची भूमिका उलगडली. ज्यावेळी मराठीत चूल, मूल विषय लिहिल्या जात होता त्यावेळी रवींद्रनाथांच्या नायिका बंड करुन उठत होत्या. त्यांना नेमकेपणाने काय हवे आहे त्याचा शोध घेत होत्या. विनोदिनी असो वा कंकाल, गिरीबाला, कल्याणी या त्यांच्या नायिकांचे मनोज्ञ दर्शन त्यांनी भाष्यातून केले. अतिथींचे स्वागत माधुरी वाडिभस्मे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन माधवी भट यांनी केले.

टॅग्स :Ravindranath Tagoreरवींद्रनाथ टागोरVidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघ