शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

नाईकनगरात कोयत्याने वार करून तडीपार गुंडाचा खून

By दयानंद पाईकराव | Updated: February 14, 2024 16:44 IST

खुनानंतर आरोपीने अजनी ठाण्यात आत्मसमर्पण केले असून शहरात सुरु झालेली खुनांची मालिका रोखण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

नागपूर : आपसातील वैमनस्यातून एका तडीपार गुंडाला आरोपीने कोयत्याने सपासप वार करून ठार केले. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास नाईकनगरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खुनानंतर आरोपीने अजनी ठाण्यात आत्मसमर्पण केले असून शहरात सुरु झालेली खुनांची मालिका रोखण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

सुरज उर्फ बिहारी अमीर महतो (२५, रा. बालाजीनगर, मानेवाडा रोड, नागपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर बिपीन कुमार गुप्ता (२० रा. नाईकनगर) असे आरोपीचे नाव आहे. सुरज हा तडीपार आरोपी आहे. त्याला वर्धा जिल्ह्यात सोडण्यात आले होते. आरोपी बिपीन आणि मृतक सुरज प्रवृत्तीचे होते. मागील काही दिवसांपासून मृतक सुरज आणि बिपीनमध्ये आपसात वाद सुरु होता.

बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते मानेवाडा रिंग रोडवरील नाईकनगरचा फलक लावलेल्या ठिकाणी भेटले. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादात आरोपी बिपीनने आपल्याजवळील कोयत्याने सुरजवर वार केला.  वार केल्यामुळे सुरज रक्तबंबाळ झाला. त्याने आपली पल्सर गाडी घटनास्थळीच सोडून बाजुच्या गल्लीत पळ काढला. त्यानंतर तो जीव वाचविण्यासाठी शाम शिरसाठ यांच्या घरात शिरला. परंतु आरोपी बिपीनही सुरजच्या पाठोपाठ शिरसाठ यांच्या घरात शिरला आणि त्याने पुन्हा कोयत्याने वार करून सुरजला संपविले.

सुरज रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच ठार झाला. या घटनेची माहिती एका ऑटोचालकाने मानेवाडा चौकातील वाहतूक शाखेचे सहायक उपनिरीक्षक कमलकांत रोकडे, संध्या ढोके यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठले असता सुरज रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. त्यांनी लगेच नियंत्रण कक्षाला फोन केला आणि त्यानंतर झोन ४ चे उपायुक्त विजयकांत सागर आणि अजनी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविला. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी