शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवैध पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपीसह तडीपार गुंडाला अटक

By योगेश पांडे | Updated: May 31, 2024 18:59 IST

Nagpur : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध पिस्तुल बाळगणाऱ्या एका आरोपीसह आणखी एका तडीपार गुंडालादेखील अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी या कारवाया केल्या.

शुक्रवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथक गस्तीवर असताना आमीर शेख बशीर शेख (३२, मिनीमाता नगर, गोधनी रोड) हा पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून देशी बनावटीचे पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याविरोधात मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाईदेखील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच झाली. गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पथक गस्तीवर असताना न्यू मानकापूर येथील लीलाकुंज येथे एक तडीपार गुंड फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस तेथे पोहोचल्यावर तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याने त्याचे नाव तबस्सुर उर्फ तस्सु वसीम अहमद (२८, ताजनगर, मानकापूर) असे सांगितले. त्याचा रेकॉर्ड तपासला असता त्याला २७ ऑगस्ट रोजी गुन्हेगारी कारवायांसाठी जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याची बाब समोर आली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी