शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बर्थ डे पार्टीत छेडछाड आणि हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 14:09 IST

हॉटेलमध्ये सुरू असलेली बर्थ डे पार्टी रंगात आली. मद्याचे पेग चढल्यानंतर एकाने संधी साधून एका तरु णीसोबत लज्जास्पद वर्तन केले आणि पार्टीचा नूरच बदलला. जबरदस्त हाणामारी, शिवीगाळ, गोंधळ वाढला अखेर या बर्थ डे पार्टीचा समारोप सोनेगाव पोलीस ठाण्यात झाला.

ठळक मुद्देवर्धा मार्गावरील हॉटेलमध्ये गोंधळ सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

आॅनलाईन लोकमतनागपूर : हॉटेलमध्ये सुरू असलेली बर्थ डे पार्टी रंगात आली. मद्याचे पेग चढल्यानंतर हॉटेलमधील मंद प्रकाशात तरु णी-महिलांसोबत तरु णही थिरकू लागले. एकाने संधी साधून एका तरु णीसोबत लज्जास्पद वर्तन केले आणि पार्टीचा नूरच बदलला. जबरदस्त हाणामारी, शिवीगाळ, गोंधळ वाढला अखेर या बर्थ डे पार्टीचा समारोप सोनेगाव पोलीस ठाण्यात झाला.सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेली ही घटना शुक्र वारी रात्री ११.३० वाजता वर्धा मार्गावरील हॉटेल झारमध्ये घडली.एका तरु णाच्या वाढदिवसानिमित्त झारमध्ये शुक्र वारी रात्री एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत काही बिल्डर, प्रॉपर्टी डिलर, व्यापारी आणि काही गुन्हेगारही सहभागी झाले होते. रात्री ११ नंतर पार्टी रंगात आली. पेग वर पेग चढले आणि संगीताच्या तालावर पार्टीत सहभागी झालेल्या तरु णी, महिलांसोबत पुरूषही थिरकू लागले. मंद प्रकाशात नृत्य सुरू असताना आरोपी शकिल गफ्फार खान (वय ३०, गोवा कॉलनी, सदर) याने एका मुलीसोबत लज्जास्पद वर्तन केले. ते पाहून इक्राम ईकबाल शेख (वय ३३, रा. मानकापूर) यांनी आरोपी शकिलला हटकले. त्यामुळे त्यावरून वाद वाढला. शिवीगाळीनंतर दोघांनीच नव्हे तर त्यांच्या मित्रांनीही एकमेकांना ठोसे लगावणे सुरू केले. त्यामुळे पार्टीचा नूरच बदलला. डान्स फ्लोअरवर नृत्याऐवजी जोरदार हाणामारी, फेकाफेक सुरू झाल्याने पार्टीत आरडाओरड, गोंधळ वाढला. अनेकांनी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद न घेताच हॉटेलमधून काढता पाय घेतला. शेवटी हे प्रकरण सोनेगाव पोलीस ठाण्यात पोहचले. इक्राम यांनी शकील तसेच त्याच्या दोन साथीदारांविरु द्ध मारहाण करून ३ लाख रु पयांची सोनसाखळी हिसकावून घेतल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरु द्ध गुन्हा दाखल केला. शनिवारी दुपारपर्यंत कोणत्याही आरोपीला अटक झालेली नव्हती.मूळ मुद्दयाला बगलविशेष म्हणजे, ज्या मुद्यावरून बर्थ डे पार्टीत हाणामारी झाली. त्याला संबंधितांनी पद्धतशीर बगल दिली. ज्या मुलीची छेड काढण्यात आली होती, त्या मुलीने तक्रार करण्याचे टाळले. तर, आयोजक आणि बिल्डर असलेल्या ईक्र ाम यांनी देखिल तिला तक्रार देण्यास बाध्य करण्याचे टाळले. त्यामुळे भर पार्टीत मुलीसोबत लज्जास्पद वर्तन करणारा आरोपी शकिल याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा