शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दर आठवड्यात भरणार गुरुजींचीच शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 19:34 IST

विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचीच आता दर आठवड्याला ऑनलाईन शाळा भरणार आहे. तसे आदेशच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी काढले आहेत. पण अनेक शिक्षकांची सेवा कोरोना निर्मूलनासाठी अधिग्रहित केली आहे. त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देऑनलाईन शिक्षणाचा आठवडी अहवाल सादर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचीच आता दर आठवड्याला ऑनलाईन शाळा भरणार आहे. तसे आदेशच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी काढले आहेत. पण अनेक शिक्षकांची सेवा कोरोना निर्मूलनासाठी अधिग्रहित केली आहे. त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.राज्यात शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण चांगल्या पद्धतीने सुरू आहे हे दर्शविण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी आपल्या अध्ययन अध्यापन कार्याचा साप्ताहिक अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबतचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेकडून देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत राज्यात शाळा बंद असल्या तरी विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, ज्या विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधने उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेऊन व शिक्षक मित्र उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण देणे सुरू ठेवले आहे. शिक्षक करत असलेल्या या प्रयत्नांची, उपक्रमांची माहिती राज्य शासनास, केंद्र शासनास व इतर राज्यांना व्हावी याकरिता शिक्षण परिषदेने दिलेल्या लिंकवर शिक्षकांनी आपण केलेल्या कार्याची माहिती भरायची आहे.ऐकावे तरी कुणाचे?एकीकडे अनेक शिक्षकांच्या सेवा कोरोना साथरोग उपाययोजना मोहिमेकरिता संलग्न करण्यात आलेल्या आहेत. या कामातून जिल्हा प्रशासनाने शिक्षकांना कार्यमुक्त केले नाही. दुसरीकडे शिक्षण विभागाकडून नवनवीन उपक्रम राबविण्याबाबत नित्य नव्या सूचना सातत्याने दिल्या जात आहेत. नेमके ऐकावे तरी कुणाचे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.शिक्षकांना कार्यमुक्त करावेकोरोनाच्या संदर्भात निरंतर सर्वेक्षण, स्वस्त धान्य दुकान, विलगीकरण केंद्र, माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम या सर्व ठिकाणी शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. शिक्षण विभागाचे निर्देश व शिक्षणाधिकारी यांच्या विनंतीनंतरही स्थानिक जिल्हा प्रशासन शिक्षकांना कार्यमुक्त करायला तयार नाही. तेव्हा एकाचवेळी शिक्षकांनी दोन्हींकडील कामे कशी करायची, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा