शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
3
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
4
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
5
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
6
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
7
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
8
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
9
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
10
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
12
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
13
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
14
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
15
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
17
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
18
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
19
रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
20
हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
Daily Top 2Weekly Top 5

सील केलेल्या नागपूरच्या  सतरंजीपुऱ्यात निघाल्या तलवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 22:29 IST

कोरोनाच्या संक्रमणामुळे सतरंजीपुरा परिसर सील करण्यात आला आहे. अशात एका गुंडाने साथीदाराच्या मदतीने तलवारीचा धाक दाखवत हंगामा केला. गुंडाच्या या आतंकाने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

ठळक मुद्देगुंडाच्या आतंकाने नागरिक भयभीत : पोलिसांनी केली अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संक्रमणामुळे सतरंजीपुरा परिसर सील करण्यात आला आहे. अशात एका गुंडाने साथीदाराच्या मदतीने तलवारीचा धाक दाखवत हंगामा केला. गुंडाच्या या आतंकाने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार कुख्यात राकेश पाटील हा सतरंजीपुरा येथील किराडपुरा येथे राहतो. तो तडीपार आहे. असे असले तरी तो सतरंजीपुरा परिसरात फिरत असतो. सतरंजीपुरा वस्तीला सील करण्यात आल्याने किराडपुरा वस्तीतही बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केले आहे. या बॅरिकेट्स जवळ परिसरातील पद्माकर लांजेवार यांनी आपली कार पार्क केली होती. अमन शेख व शिवम ढगे यांनी बॅरिकेट्स काढून पद्माकरच्या कारवर चढून रस्ता पार करीत होते. तेव्हा पद्माकर यांनी त्यांना हटकले. मात्र त्यांनी पद्माकरवरच हल्ला केला. वस्तीचे लोक पद्माकरच्या मदतीसाठी धावले. हे बघून अमन व शिवम पळून गेले. प्रत्यक्षदर्शीनुसार अमन व शिवम यांच्यासोबत राकेश पाटील अन्य चार पाच साथीदार तलवारी घेऊन वस्तीवर हल्ला करण्यासाठी सुभाष पुतळा चौकाकडून येत होते. त्यांना बघून सुभाष पुतळा चौकातील युवकसुद्धा एकत्र आले. याच दरम्यान कुणीतरी घटनेची लकडगंज पोलिसांना माहिती दिली. काही अंतरावरच पोलीस ठाणे असल्याने पोलीस दिसताच राकेश पाटील फरार झाला तर अमन व शिवम पोलिसांच्या हातील लागले. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध पद्माकर यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.सतरंजीपुरा वस्तीत कोरोना संक्रमणाचा आकडा वाढला आहे. या वस्तीला अनेक दिवसांपासून सील करण्यात आले आहे. येथे लकडगंज पोलीस तैनात केले गेले आहे. लोकांनी बाहेर पडू नये, असे प्रशासनाचे निर्देश आहे. असे असतानाही हल्ला होणे, तलवारी घेऊन फिरणे हा प्रकार घडल्यानंतरही पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. सतरंजीपुरा वस्तीत यापूर्वी सुपारीचा कारखाना सुद्धा सापडला होता. या प्रकरणीही लक डगंज पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर