शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
3
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
4
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
5
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
6
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
7
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
8
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
9
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
10
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
11
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
12
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
13
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
14
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
15
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
16
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
17
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
18
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
19
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
20
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 

चहावाल्यांच्या चहाचा गोडवा हरवला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:34 IST

जुना बाबूलखेडा येथे राहणार शुभम चंदू कुंभारे. चार वर्षांपासून एनआयटी गार्डनजवळ चहा विकण्याचे काम करतो. याच भरवशावर म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी तो सांभाळत होता. कोरोना रोखण्यासाठी लागलेल्या ताळेबंदीत त्याचा रोजगारच हिरावला आहे. त्यामुळे आता कुटुंबासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशेकडोंचा गेला रोजगारआर्थिक अडचणींनी पछाडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुना बाबूलखेडा येथे राहणार शुभम चंदू कुंभारे. चार वर्षांपासून एनआयटी गार्डनजवळ चहा विकण्याचे काम करतो. याच भरवशावर म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी तो सांभाळत होता. कोरोना रोखण्यासाठी लागलेल्या ताळेबंदीत त्याचा रोजगारच हिरावला आहे. त्यामुळे आता कुटुंबासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.शुभम कुंभारे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. टाळेबंदीने लाखो कामगार आणि लहानमोठ्या व्यवसायिकांचा रोजगार गेला आहे आणि शहरातील शेकडो चहा विक्रेते हे त्यातीलच आहेत. शहरातील गलोगल्लीत कधी मोठ्या दुकानात तर कधी लहान लहान दुकाने लावून चहा विक्री केली जाते आणि यातून शेकडोंना रोजगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळाला आहे. शुभम फार जास्त शिकलेला नाही. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. वडील टेलर आहेत आणि महाल येथे एका मोठ्या दुकानात ते कामाला जात होते. अल्प शिक्षित असल्याने रोजगाराची चिंता त्याला आणि आईवडिलांनाही होती. त्यावेळी शुभमने एनआयटी गार्डनजवळ चहाचे दुकान थाटले. त्यामुळे कुटुंबाला आधार तर मिळालाच पण वडिलांनाही आराम मिळाला होता. शुभम सांगतो, रोज ७००-८०० रुपयांची विक्री व्हायची. चांगलं दुकान चालायचं. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी अतिक्रमणाची कारवाई झाली आणि महिनाभर दुकान बंद ठेवावे लागले. १० दिवसांपूर्वी त्याने पुन्हा दुकान सुरू केले होते पण आता पुन्हा कोरोनामुळे आलेल्या परिस्थितीने त्याचा रोजगार पुन्हा हिरावला गेला आहे. एका महिन्यापासून दुकान बंद आहे आणि आता कुटुंबासमोर संकट उ•ो झाले आहे. विशेष म्हणजे यात वडिलांचाही रोजगार बंद झाला आहे.शुभमसारखे शेकडो चहा विक्रेते आहेत ज्यांच्यावर टाळेबंदीने संकट ओढवले आहे. काही अतिशय लहान विक्रेते थोड्याफार व्यवसायातून किडुकमिडुक जमा करून आपला प्रपंच भागवत होते. मात्र कोरोनाने त्या सर्वांना अडचणीत टाकले आहे. शहरात रस्त्यारस्त्यावर अशी चहाची अनेक दुकाने लागली होती, ती बंद झाली आहेत. घरी आवश्यक तेवढे पैसे नाहीत आणि अन्नधान्यही नाही. त्यामुळे कुटुंबाची गरज पूर्ण करण्याचा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे.काही वळले दुसऱ्या व्यवसायाकडेचहाटपरी बंद झाल्याने स्वत: शुभम एका टरबूज विक्रेत्याकडे काम करीत आहे. १००-१५० रोजी मिळाली तीच खूप आहे, असे तो म्हणतो. अनेक चहा विक्रेत्यांनी भाजीपाला विक्री किंवा फळे विक्रीचे काम सुरू केले आहे. घराचा प्रपंच चालविण्यासाठी काही पर्यायच नसल्याचे अनेकांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस