नागपूर : प्रियकराला टाळण्यासाठी लेकुरवाळ्या प्रेयसीने लग्न करायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट घातली. ती जिव्हारी लागल्याने प्रेमवेड्या तरुणाने स्वत:चा जीव देऊन प्रेमाची किंमत मोजली. टीव्ही मालिकेतील वाटावी अशी ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. रोशन भास्कर खिरे (२८) असे मृत प्रियकराचे नाव आहे. रोशन आणि किरण हे दोघे दुकानात काम करायचे. किरणला पती नाही. दोन मुले आहेत. रोशनसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्याने किरणसोबत लग्न करण्याची तयारी केली. मात्र, रोशनला टाळण्यासाठी किरण व तिच्या नातेवाइकांनी लग्न करायचे असेल तर दोन लाख रुपये दे, अशी अट घातली. हे असह्य झाल्यामुळे रोशनने रविवारी दुपारी विष प्राशन केले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी रोशनला मृत घोषित केले. तत्पूर्वी त्याने सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण लिहून ठेवले. चौकशीत ती सुसाईड नोट पोलिसांना सापडली. त्यावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नासाठी प्रेयसीने मागितले दोन लाख, त्याने दिला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 04:47 IST